Children who are vaccinated at the same time have a lower risk of corona 
नागपूर

ज्या बालकांचे लसीकरण वेळेत त्यांना कोरोनाचा धोका कमी 

राजेश प्रायकर

नागपूर  : कोरोनामुळे लहान मुले, किशोर आणि कुमारांच्या आयुष्यातही मोठा बदल झाला. शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग बंद झाल्याने मुले घरीच आहेत. त्यांना मोबाईल, टीव्हीचे व्यसन जडले आहे. कोरोनाने कुटुंबासोबत वेळ घालवण्याची उत्तम संधी दिली आहे. मुलांच्या विकासासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी या काळात त्यांच्यासोबत वेळ घालवा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर आणि बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयश्री शिवलकर यांनी दिला.

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात मंगळवारी (ता. १२) डॉ. उदय बोधनकर, डॉ. जयश्री शिवलकर आणि सोहम फाउंडेशनचे अध्यक्ष संजय अवचट यांनी ‘कोव्हिड काळात बालकांचे लसीकरण आणि मुलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

देशात दरवर्षी सुमारे ५ लाख बालके लसीकरणाअभावी दगावतात. कोव्हिडच्या काळात लसीकरण न झालेल्या बालकांची संख्या मोठी असून ते धोकादायक आहे. शहरामध्ये मोफत लसीकरणासाठी ५० केंद्र आहेत त्यांचा लाभ घ्या. बाळ जन्मत:च त्याला टीबीची लस दिली जाते. चुकली असल्यास पाच वर्षाच्या आत ती बाळाला देणे आवश्यक आहे. याशिवाय पोलिओची लसही महत्वाची आहे. मिझल्स रुबेला (एमआर), रोटा या लसीही बालकांना देणे अत्यावश्यक आहे. 

वैद्यकीय अभ्यासानुसार ज्या बालकांना या सर्व लस वेळेवर देण्यात येत आहेत. त्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे दिसून आल्याची माहिती यावेळी डॉ. उदय बोधनकर यांनी दिली. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीही काही लस महत्त्वाच्या आहेत. त्यासुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. जयश्री शिवलकर यांनी मुलांची मानसिकता आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात माहिती केले. पालकांनी स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतानाच मुलांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे बोलणे, वागणे याकडे लक्ष द्या, त्याचे निरीक्षण करा. सद्याच्या काळात मुलांचे मित्र बनून त्यांची जीवनशैली सुलभ करण्याकडे भर द्या, असे आवाहन त्यांनी केले.

संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT