अपघातात चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर sakal
नागपूर

Nagpur : अपघातात चिमुकल्याचा मृत्यू; आई गंभीर

मनोहर घोळसे

नागपूर : तालुक्यातील बिडगाव जटामखोरा वळणावर समोरून येत असलेल्या चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने एका चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. आई पुनम कैलास कुमरे या गंभीर जखमी झाल्यात, तर मामा परमेश्वर इवनाती किरकोळ जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बहिणभाऊ आणि भाचा हे तिघेही बिडगाववरून केलवद येथे दुचाकीने बाजाराला आले.

बाजार करून परत जात असताना जटामखोरा वळणावर समोरून येत असलेल्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गगन कुमरे (वय४)हा जोरात आदळल्याने त्याची मान तुटली व जागीच मरण पावला.

गगनची आई पुनम कुमरे हिच्या डोक्याला जबर मार लागला, तर मामा परमेश्वर इवानाती हा जखमी झाला. घटनेची माहिती रायबासा जटामखोराचे उपसरपंच सोनू रावसाहेब तसेच सदस्य दीपक ढोबळे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना गाडीमध्ये टाकून सावनेर येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले. चिमुकल्या गगनची मान तुटल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गगनच्या आईला डोक्याला जबर मार लागल्याने तिला नागपूर येथील मेडिकल येथे रवाना केले. पुढील तपास केळवद पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT