Chiranjiv Prasad  
नागपूर

चिरंजीव प्रसाद नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक

अनिल कांबळे

नागपूर : नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.एम. प्रसन्ना हे आता औरंगाबाद क्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असणार आहेत. यासंबंधीचा आदेश गृहमंत्रालयातर्फे आज जारी करण्यात आला.

केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आल्याने प्रतीक्षाधीन असलेले निखिल गुप्ता यांची बदली औरंगाबादच्या पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कुमार यांना सध्याचे अपर पोलिस महासंचालक श्रेणीतील पद विशेष पोलिस महानिरीक्षक श्रेणीमध्ये अवनत करून नियंत्रक वैद्यमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा -  डॉ. उपाध्याय यांची मुंबईला बदली, उपराजधानीला मिळाले नवे आयुक्त

भारतीय पोलिस सेवेतील विशेष पोलिस महानिरीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम मधील कलम २२ (न) च्या तरतुदीनुसार भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या उपरोक्तप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत. सोबत पोलिस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन, उपरोक्त अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कार्यमुक्त करावे, अशा सूचनाही गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT