Cloudy weather threatens wheat and gram crops Farmers news
Cloudy weather threatens wheat and gram crops Farmers news 
नागपूर

ढगाळ वातावरणामुळे गहू, हरबऱ्याचे पीक धोक्यात; शेतकरी पुन्हा जाणार सावकारांच्या दारी

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यात १० ते १५ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. चण्याची पेरणी होऊन जवळपास १ ते २ महिने झाले असून, चना पीक सध्या फुलावर व घेनगरावर आहे. परंतु, ढगाळलेल्या वातावरणामुळे पिकांवर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.

शेतकरी सतत या पिकावर फवारणी करीत असून, फारसा किडीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. तसेच मोठ्या प्रमाणात चना पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभे असलेले चण्याचे पीक जागेवरच वाळत आहे. त्यामुळे हाती असणारे चण्याचे पीक वाया जाताना दिसत आहे. जानेवारी महिना म्हटला की कडाक्याची थंडी, थंडीच्या वातावरणामध्येच चना, गहू पिकांची पेरणी केली जाते.

थंडीमुळे या पिकांची वाढ चांगली होते व उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. परंतु, यावर्षी ढगाळलेल्या वातावरणामुळे थंडी पडत नसल्यामुळे चना, गव्हाचे पीक धोक्यात आले आहे. पिकाची वाढ थांबली आहे. गहू लहान असतानाच त्याला उंबळ्या यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्पनात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.

ढगालेल्या वातावरणामुळे पावसाची दात शक्यता असल्यामुळे कापणीला आलेले तुरीचे पीक अडचणीत सापडले आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. लागलेला पैसे निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

चणा पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव
ढगाळलेल्या वातावरणामुळे पिकांची वाढ थांबली आहे. चणा पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे चण्याचे उभे पीक वाळत आहे. कीडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. गव्हाचे पीक लहान असतानाच उंब्यावर येत आहे. त्यामुळे उत्पनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. 
- हेमंत ठोबरे,
शेतकरी, मुक्तापूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT