Chief Minister Eknath Shinde esakal
नागपूर

CM Eknath Shinde : कट, करप्शन, कमिशन हीच काँग्रेसची त्रिसूत्री

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जंग जंग पछाडूनही काँग्रेसचा मोठा पराभव झाला,’ अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - ‘कट, कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जंग जंग पछाडूनही काँग्रेसचा मोठा पराभव झाला,’ अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना केली.

‘काँग्रेसच्या काळात राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. त्यात पशुखाद्य गैरव्यवहार, कॉम्प्युटर गैरव्यवहार, कोळसा गैरव्यवहार, टू-जी अशी गैरव्यवहारांची मोठी यादी आहे. त्यामुळे जनतेने २०१४ मध्ये त्यांचे तोंड काळे केले. २०१९ मध्ये देखील या पक्षाला तेच भोगावे लागले. तीच परिस्थिती २०२४ मध्ये झाली.

कट, कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पतंप्रधान झाले,’ असे शिंदे म्हणाले.

‘पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसला गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही,’ असे शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Pune Accident: आत्याच्या लग्नाचा आनंद क्षणात विरला; आळंदीत दोन वर्षांच्या श्रुतिकाचा भीषण अपघातात मृत्यू, डॉक्टर चालक ताब्यात

Khed Crime: आधी घरफोडी... मग पुरणपोळीवर ताव! खेडमध्ये एका रात्रीत आठ घरांवर चोरट्यांचा डल्ला

ऐतिहासिक निर्णय! सातारा जिल्ह्यातील धोम धरणग्रस्त २९ गावांना मोठा दिलासा; पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी

SCROLL FOR NEXT