Ramdas Athawale sakal media
नागपूर

हे भाजप-सेना युतीचे संकेत; युतीचे सरकार लवकरच

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य, त्यावर व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया बघता हे भाजप आणि शिवसेना युतीचे संकेत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. आपण वारंवार भाजप-सेनेने एकत्र यावे हीच मागणी करीत होतो, असेही ते नागपूर विमानातळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत राहून काही फायदा नाही. सध्याची महाविकासआघाडी अनैसर्गिक अशीच आहे. याउलट भाजप-सेना युती २५ वर्षे जुनी आहे. काही मतभेद असतील तर ते दूर करावे, भाजपच्या नेत्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, आपण माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून हे सांगणार असल्याचे आठवले म्हणाले.

भाजपच्या नेत्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करावी. दोन्ही पक्षाने एकत्रित येऊन सरकार स्थापन करावे. त्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल. शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे असे वाटणारे अनेक आमदार शिवसेनेत आहेत. त्यांना भाजपसोबत जावे असे वाटते. म्हणून आता उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. मी नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो. माझी भूमिका मांडली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, भाजप नेत्यांनीसुद्धा पुढाकार घ्यावा असे आठवले म्हणाले.

नवीन सरकार स्थापन होईल

शिवसेना व भाजपचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकते. मी फडणवीस यांना भेटून त्यांनाही सांगणार आहे. नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद मिटला पाहिजे. शिवसेना या सरकारमधून बाहेर पडेल आणि नवीन सरकार स्थापन होईल, असेही भाकीत रामदास आठवले यांनी वर्तविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT