Cockfighting Sports 
नागपूर

Cockfighting : कोंबड्याच्या झुंजीला खेळाचा दर्जा मिळावा; शेतकऱ्याची उच्च न्यायालयात धाव

राज्यामध्ये कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यामध्ये कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, याकरिता शेतकारी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र व राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे सचिव आणि पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

देशामध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम-१९६० लागू झाल्यापासून कोंबडा झुंजी आयोजित करण्यावर बंदी आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये पारंपरिक पद्धतीने कोंबडा झुंज आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली होती. कोंबडा झुंजीत धारदार ब्लेड, जुगार व सट्टा लावण्यास मनाई करण्यात आली होती. याशिवाय, देशात अनेक ठिकाणी बंदी झुगारून कोंबडा झुंजी आयोजित केल्या जातात.

२०१९ मध्ये आंध्र प्रदेश येथे कोंबडा झुंजीत केवळ तीन दिवसांत ९०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ही बाब लक्षात घेता, कोंबडा झुंजी अधिकृत केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच, या खेळामुळे कुकुटपालन व कोंबड्यांचे देशी वाण संरक्षित करण्यास प्रोत्साहन मिळेल. देशात क्रिकेटवरही सट्टा लावला जातो.

पण त्यामुळे क्रिकेटवर बंदी आणण्यात आली नाही. याशिवाय, कोंबड्यांचा आहारासाठी उपयोग करण्यावरही बंदी नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कोंबडा झुंजीवर बंदी लागू करणे तर्कहीन आहे, असा दावा चाचरकर यांनी केला आहे. न्यायालयात चाचरकरतर्फे ॲड. अश्विन इंगोले कामकाज पाहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT