colleges did mistake while sending Internal marks of students and blaming university  
नागपूर

चूक महाविद्यालयांची खापर मात्र विद्यापीठावर; अंतर्गत गुण, अचूक विषय पाठवण्यात गडबड 

मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. मात्र, निकाल लागल्यावर गुणपत्रिकांमध्ये काही प्रमाणात चुका असल्याचे दिसून आले. त्याबाबत येत असलेल्या तक्रारीचे संपूर्ण खापर विद्यापीठावर फोडण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालयांच्या चुकांमुळेच या चुका झाल्या असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नागपूर विद्यापीठाच्या वतीने ऑक्टोबरमध्ये अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यातील बहूतांश परीक्षांचा निकाला जाहीर झाला आहे. मात्र, अनेक विद्याथ्र्यांचे निकालामध्ये चुका असल्याचा प्रकार समोर आला आहे. काहींचे निकाल हे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर काहींना अनुत्तीर्ण दाखवण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर समस्येच्या मुळाशी जाऊन शोध घेतल्यास यामध्ये महाविद्यालयाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थी विद्यापीठाला दोष देत असल्याचे निदर्शनास आले.

नुकतेच बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या एका विद्याथ्र्याचे दोन विषयाचे पेपर होते. विद्याथ्र्याच्या सांगण्यानुसार, त्याने दोन्ही विषयाची परीक्षा दिली असून पेपर जमा झाल्याचा अंतिम संदेशही आला. त्याचे स्क्रीन शॉटही विद्यार्थ्यांकडे आहेत. याशिवाय विद्यापीठाने परीक्षेत अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात विद्यार्थ्यांचे नाव नव्हते.  

नुकत्याच जाहीर झालेल्या बी.एस्सी.च्या निकालात शुभमला दोन्ही विषयात अनुपस्थित दाखवण्यात आले. त्यामुळे परीक्षा देऊनही विद्यार्थ्यांला अनुपस्थित दाखवल्याने विद्यापीठावर टीकेची झोड उडत होती. मात्र, हा विद्यार्थी २०१७ पासून परीक्षा देत असून त्याच्य अनुत्तीर्ण विषयाचे गुण महाविद्यालयाने तीन वर्षांपासून विद्यापीठाला पाठवलेच नाही.

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षेचे गुण विद्यापीठाला न मिळाल्याने त्याचा निकाल जाहीर करणे अशक्य असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांच्या अशा विविध तक्रारींचा निवाडा लावताना अनेकदा महाविद्यालयांकडून होणाऱ्या चुकांचे खापर विद्यापीठावर फोडले जात असल्याचा आरोप विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कॅबिनेट बैठकीला सुरुवात, पेपरफुटी प्रकरणावर चर्चा होणार?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT