Commissioner of Police Vinita Sahu is happy 
नागपूर

चिमुकल्याच्या 'कडक सॅल्यूट'ने जिंकले मन

अनिल कांबळे

नागपूर : शहरात सध्या संचारबंदी आणि लॉकडाउन असल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलिस "रूट मार्च' करीत जनजागृती करीत आहेत. मात्र, रविवारी दुपारी रूट मार्चचे नेतृत्व करणाऱ्या डीसीपी विनीता साहू यांना सैनिकाचा पेहराव केलेल्या एका चिमुकल्याने "कडक सॅल्यूट' मारला. हा क्षण अगदी कॅमेरात टिपण्याजोगा होता. डीसीपी विनीता यांनी लगेच प्रतिसाद देत त्या चिमुकल्याशी संवाद साधला. या भावनिक क्षणामुळे रूट मार्च करणाऱ्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून चिमुकल्याचे कौतुक केले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्‍त विनीता साहू यांनी आपल्या क्षेत्रात रविवारी रूट मार्च केला. नागरिकांना घरात राहण्याबाबत तसेच पोलिसांना सहकार्य करण्याबाबत सूचना दिल्या. दुपारी चार वाजता डीसीपी साहू यांचा मार्च सदर परिसरात भागात पोहोचला. रूट मार्च सुरू असताना एक चिमुकला आपल्या आईसह रस्त्यावर उभा होता. तो अचानक रस्त्याच्या कडेला आला. 

त्याने सैनिकाचा पेहराव केलेला होता. सैनिकाची कॅप घालून असलेल्या चिमुकल्याने डीसीपी विनीता साहू यांना "जय हिंद' म्हणत "कडक सॅल्यूट' ठोकला. हा प्रकार सर्व जण पाहत होते. डीसीपी साहू यांनी लगेच त्या चिमुकल्याला प्रतिसाद दिला. त्याचे कौतुक करीत संवाद साधला. त्या चिमुकल्याने लगेच आईच्या हातातील चहाच्या कपाची थाळी आणि बिस्किटे समोर करीत सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना चहा दिला. 

सॅल्यूटने तणाव निघून गेला
रूट मार्च करीत असताना कुणी फुलांचा वर्षाव करतात तर कुणी चहा-नाश्‍ता ऑफर करतात. परंतु, रूट मार्च करताना आम्ही थांबत नाही. परंतु, या चिमुकल्याने ठोकलेल्या "कडक सॅल्यूट'मुळे मी भारावून गेले. त्यामुळे ताफा थांबवून त्या चिमुकल्याचे कौतुक करावेसे वाटले. हा क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. चिमुकल्याच्या एका सॅल्यूटने आमचा तणाव निघून गेला. त्याच्याबद्दल आपुलकी वाटली आणि मन भरून आले. 
- विनीता साहू, पोलिस उपायुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT