Committee refuses to issue validity certificate to Gowari community 
नागपूर

या समितीने फासला न्यायालयाच्या आदेशाला हरताळ, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नीलेश डोये

नागपूर  : गोवारी समाजाला आदिवासी जमातीचे जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. राज्य शासनाने तसे आदेशही काढले. दोन वर्षांनंतर शासनाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात ‘एसएलपी’ दाखल केले. न्यायालयाने यावर कुठलीही स्थगिती दिली नसताना
गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यास अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने नकार दिला आहे. समितीकडून न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला जात असून यामुळे गोवारी समाजात रोष आहे.

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती मागितली. सर्वोच्च उच्च न्यायालयाने त्यास नकार देत दोन वर्षे उशिरा एसएलपी का दाखल केल्यावरून फटकार लावत दोन महिन्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. पण, या निर्णयाच्या आधारे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्त व उपाध्यक्ष यांनी गोवारी समाजाला जातवैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. 

त्यामुळे आदिवासी समाजामध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यासंदर्भात आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांच्या नेतृत्वात जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत समितीच्या उपाध्यक्षांना निवेदन देण्यात आले. वैधता प्रमाणपकत्र देण्याची मागणी केली. यावेळी संजय हांडे, जयदेव राऊत, रामेश्वर मोगरे, कृष्णा वाघाडे, सुरेश कोहळे, सुरेखा राऊत, गायत्री काळसर्पे, धनंजय ठाकरे, वसंतराव गजबे, प्रकाश सोनवाणे, श्रावण नेवारे, माया सोनवाणे, शीतल नेवारे आदी उपस्थित होते.

न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान
गोवारींना जातवैधता प्रमाणपत्र नाकारून न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान अधिकारी करीत आहेत. त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल. तसेच त्यांची तक्रारही करण्याच येईल.
कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT