corona सकाळ
नागपूर

नागपूर : बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पटीपेक्षा जास्त

शनिवारी ८ मृत्यूची नोंद; सक्रिय रुग्णांतही घट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बाधितांचा आलेख दिवसेंदिवस खाली येत असून कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. गेल्या चोविस तासांत १ हजार ३१३ बाधित आढळून आले असून २ हजार ७४७ बाधितांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात शनिवारी ८ मृत्यूची नोंद करण्यात आली असून यात शहरातील सहा जणांचा समावेश आहे.

बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पटीपेक्षा जास्त गेल्या काही दिवसांत कोरोनाबळींची संख्याही दहाच्या खाली आली आहे. बाधितांच्या संख्येतही सातत्याने घट होत असल्याने आश्वासक वातावरण तयार होत आहे. जिल्ह्यात शनिवारी ८ मृत्यूची नोंद करण्यात आली असून यातील दोघे जिल्ह्याबाहेरचे आहेत. शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला. यासोबतच शहरातील एकूण बळींची संख्या सहा हजारांवर पोहोचली. जिल्‍ह्यातील एकूण बळींची संख्या १० हजार २८६ पर्यंत पोहोचली. गेल्या चोविस तासांत नवीन १ हजार ३१३ बाधित आढळून आले असून शहरातील ७२३ जणांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील ५३० तर जिल्ह्याबाहेरचे ६० जण बाधित आढळून आले. बाधितांची एकूण संख्या ५ लाख ७० हजार ५९५ पर्यंत पोहोचली. दरम्यान, बाधितांच्या तुलनेत शनिवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आढळून आली. आज जिल्ह्यात २ हजार ७४७ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार २३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांचा आलेख खाली येत असल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसून येत आहे. आता १६ हजार ७४ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील ९ हजार ४०७ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT