नागपूर : कोंढाळीतील रिंगणाबोडी शिवारातील फार्महाऊसमध्ये निराला कुमार सिंग आणि अमरिश गोळे यांची गोळ्या झाडून खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात फेकून देणारा कुख्यात ओंकार महेंद्र तलमले (वय २५ रा. स्मृती-लेआऊट, दत्तवाडी) याच्यावर बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, आणखी २८ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.
या तक्रारकर्त्यांनाही त्याने नोकरीच्या नावावर एक कोटीपेक्षा अधिक रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार तलमले याने नासा येथे अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना गंडा घातला.
ओंकार याने अश्विनला नॅशनल रिमोट सेंसींग सेंटर (आरआरएससी) येथे कनिष्ठ वैज्ञानिक या पदावर कार्यरत असल्याची बतावणी केली. या संस्थेत मोठ्या प्रमाणात कार्यालयीन जागा रिक्त असून त्या जागा भरायच्या असल्याची बतावणी केली.
संस्थेतील अधिकारी चांगल्या ओळखीचे असल्याने तिथे ‘सिनिअर ॲडमिन’ पदावर नोकरी लावून देतो अशी बतावणी केली. त्यासाठी त्याने अनेक बेरोजगार युवकांकडून दोन ते पाच लाख रुपये घेतले. त्यापैकी १११ जणांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान याबाबत माहिती मिळताच, आणखी युवकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यात २८ तक्रारदात्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडूनही अशाच प्रकारे सरकारी नोकरीचे आमिष दाखवित पैसे उकळल्याची माहिती समोर आली. ही फसवणूक जवळपास एक कोटी रुपयावर आहे.
दरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये त्याचे १४ बॅंक खाती असल्याची माहिती समोर आली असून हे सर्व खाते आर्थिक विभागाने गोठविले आहे. त्यापैकी ९ खाती एकाच बॅंकेतील आहेत. याशिवाय त्याची कारही जप्त केली आहे. सध्या तलमले ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे.
मनसेचा कार्यकर्ता ते अट्टल गुन्हेगार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता होता. मात्र, त्याच्या कारवायामुळे त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यातही तो पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतचे फोटो दाखवून अनेकांकडून वसुलीही करीत असल्याची माहिती आहे. त्यातूनच त्याने नासा येथे अधिकारी असल्याचे खोटे आयकार्ड तयार केले होते. त्यातून अनेकांना गंडा घालून ‘वुड पिकर’नावाची कंपनीही सुरू केली. विशेष म्हणजे, तो एका ठिकाणी लॅब असिस्टंट म्हणूनही काम करायचा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.