नागपूर

गावाला दिले संगणक साक्षरतेचे धडे; महिलांना केले आत्मनिर्भर

सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर) : एकविसाव्या शतकात मानवाला संगणक मोठ्या प्रमानात उपयोगी ठरत आहे. संगणक हा जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. आधुनिक काळातील विज्ञानाने दिलेली ही देणगी आहे. संगणकात साक्षर करण्याचे काम करीत गावगाड्यापर्यंत नेण्याचे कार्य निस्वार्थपणे करणारे कर्मयोगी म्हणजे सचिन हरीचंद्र हूड (रा. टेकाडी). शिक्षण फक्त वर्ग बारावीपर्यंतच. संगणकासोबत मैत्री करून स्वतः गावावरून कन्हानपर्यंत संगणकाचे शिक्षण अर्जित करून त्यानंतर कुणाकडे नोकरी करून आपलं शिक्षण मर्यादित न ठेवण्याचा या ध्येयवेड्या युवकाचा ध्यास होता.

आपल्यासोबत गावातील इतर मुलांना गावापासून लांब संगणक शिकण्यासाठी जावे लागणार नाही, अशी इच्छा मनी बाळगून २०१० मध्ये टेकाडी ई-स्कूल नावाने दोन संगणकासोबत स्वतःच एमसीआयटी सेंटर सुरू केले. दोन संगणकावर दहा विद्यार्थ्यांनी संगणकाचे धडे गिरवायला सुरवात केली होती. हळूहळू गावातील मुलांचा संगणकप्रति कल वाढू लागला.

२०१५ मध्ये त्यांनी १० संगणक खरेदी करून ५० विद्यार्थ्यांची संगणक साक्षरतेकडे वाटचाल सुरू केली. मनात जिद्द आणि गावाप्रति प्रेम सचिनला शांत बसू देत नव्हते. अशात गावातील नागरिक छोट्या मोठ्या गरजा आणि ऑनलाइन पद्धतीची कामे घेऊन यायला सुरवात केल्यानंतर त्यांनी त्या दिशेने अभ्यास करीत गावात प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत १,७०० विद्यार्थ्यांना मोफत संगणकाचे शिक्षण दिले.

कोविड काळात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागे. अशात प्रत्येक व्यक्तीला गावाबाहेर जाणे जमत नसल्याने आशेने टेकाडी ई स्कूल पाहायचा. सचिन यांनी जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत २५ मुलींना मोफत संगणकसाक्षर केले. सोबतच शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना कन्हान स्थित बँकांमध्ये खेटा माराव्या लागायचा, तो त्रास कमी करण्यासाठी वयोवृद्ध शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून ‘आपले सेवा केंद्र’ सुरू करून त्यामार्फत घरोघरी जाऊन शेतकरी कर्जमाफी योजना राबविली. प्रधामंत्री श्रम योगी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला.

७० महिलांना आत्मनिर्भर बनविले

प्रधानमंत्री आयुष्यमान योजना गावातच सुरू केल्याने अनेकांचा नाहक त्रास कमी झाला. गावातच बँकेचे बीसी पॉईंट, एचपी गॅस सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सध्या टेकाडी ई-स्कूलमार्फत सुरू आहे. सोबत सचिन यांनी संगणकासोबत गावातील सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा कोरोनाकाळात करावी लागणारी मदत, यासर्व गोष्टी अगदी निस्वार्थ आणि सामाजिक बांधिलकी जोपासत निरंतर सुरू असतात. प्रधानमंत्री यांच्या आत्मनिर्भर भारत या घोषणेआधीच सचिन यांनी निःशुल्क महिलांसाठी शिवणकाम आणि ब्युटीपार्लर वर्ग सुरू करून त्यातून ७० महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT