nitin raut 
नागपूर

महावितरणची आर्थिक स्थिती बिकट, ऊर्जामंत्री केंद्राकडे करणार ही मागणी...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. या काळातील वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीजग्राहकांना बिलात सवलत देण्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी करणार असून लवकरच केंद्राला पत्र लिहिणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. 

लॉकडाऊन नंतर तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल नागरिकांना पाठविण्यात आले आहे. बिलाची रक्कम भरमसाठ असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि रोष आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. नितीन राऊत यांनी आज बिजलीनगरातील ऊर्जा अतिथीगृह येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

घरगुती वीज ग्राहकांचे विद्युत शुल्क, वीज बिलाचे हफ्ते आणि कालावधी, एकरकमी विजेच्या बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना सवलत, वीजबिल हफ्त्यावरील व्याज तसेच इतर राज्याने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून महावितरणने स्वयंपूर्ण प्रस्ताव दोन दिवसात सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. 

लॉकडाउनमुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना अतिरिक्त भुर्दंड पडू नये, तसेच त्यांना वीज बिल भरण्यासाठी जास्तीत जास्त सवलत कशा पद्धतीने देता येइल, यादृष्टीने महावितरणने पाउले उचलावीत. बिलाबाबत ग्राहकांचे समाधान होण्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्ष अधिकाधिक संवाद वाढवावा, वीजबिल सोप्या भाषेत समजावून सांगावे, त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभावी वापर आणि जनमताच्या कौलाचा आदर देखील करावा, अशी सूचना ऊर्जामंत्र्यांनी केली. 

मुंबई येथून ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, प्रभारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, कार्यकारी संचालक (देयक व महसूल) योगेश गडकरी तर नागपूर येथून हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, अनिल खापर्डे, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यवस्थापक वित्त व लेखा शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे प्रामुख्याने उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT