Congress agitation ED Notice Sonia Gandhi and Rahul Gandhi sakal
नागपूर

‘मोदी हमसे डरते है, ईडी को आगे करते है’

काँग्रेसचे जोरदार आंदोलन : राऊत, वडेट्टीवार, ठाकरेंना घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवल्यानंतर संतप्त झालेले कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आज जोरदार आंदोलन केले. हजारो कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयावर धडक दिली. ‘मोदी हमसे डरते है, ईडी को आगे करते है’ अशी घोषणाबाजी केली. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता दिसताच पालकमंत्री नितीन राऊत, आमदार विकास यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोमवारी दुपारी बारा वाजता विदर्भातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकले. आंदोलनाचे समन्वयक विकास ठाकरे आणि माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूला नितीन राऊत, ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा घेण्यात आली.

सुमारे दोन वाजताच्या सुमारास सर्वांनी एकत्रितपणे ईडी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक दिली. मोदी हमसे डरते है, ईडी को आगे करते है, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, तानाशाही नहीं चलेगी, अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. ईडी कार्यालयापासून कार्यकर्त्यांना लांब ठेवण्यासाठी कठडे लावण्यात आले होते. कठडे तोडून कार्यकर्ते कार्यालयाच्या दिशेने जात असल्याने पोलिसांसोबत बाचाबाची झाली. कोणी ऐकत नसल्याचे बघून पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेणे सुरू केले.

पदाधिकाऱ्यांना इशारा

काँग्रेसचे आंदोलन असतानाही अनेक पदाधिकारी यात सहभागी झाले नाहीत. त्यांची यादी हायकमांडकडे पाठविली जाईल. तशी सूचनाही अ.भा. काँग्रेस कमेटीतून देण्यात आली आहे. ज्यांना काँग्रेसने वारंवार उमेदवारी दिली, मोठी पदे दिली ते पक्षाच्या कार्यक्रमात सहभाही झाले नाहीत. त्यांची यादी नावासह पाठविण्यात येईल, असे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.

जेवढे दाबाल तेवढी ताकद दाखवू

भाजपच्यावतीने आम्हाला जेवढे दाबण्याचा प्रयत्न केला जाईल, तेवढी आम्ही आमची ताकद दाखवू. ईडीचा धाक दाखवून आमदारांना खरेदी केले जाऊ शकते, कार्यकर्त्यांना नाही. इंदिरा गांधी यांनाही अटक करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा देशात काय घडले याचा विचार करा, असा इशारा नितीन राऊत यांनी दिली.

विभाजनाचे षडयंत्र

विजय वडेट्‍टीवार म्हणाले, भाजप देशाच्या विभाजनाचे षडयंत्र रचत आहे. सत्तेचा वापर भाजप विरोधकांना संपवण्यासाठी करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT