Ravindra Bhoyar e sakal
नागपूर

विधान परिषद : मतदानाच्या काही तासांपूर्वी काँग्रेस उमेदवार बदलणार?

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विधानपरिषदेच्या (Nagpur Assmebly Council Election) निवडणुकीसाठी मतदान काही तासांवर येऊन ठेपले आहे. त्यात काँग्रेसने भाजपकडून आयात केलेल्या रविंद्र भोयर (Congress Candidate Ravindra Bhoyar) यांना उमेदवारी दिली आहे. पण, आता मतदानाच्या काही तासांपूर्वी काँग्रेस उमेदवार बदलणार आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत. आमचा उमेदवार बदलून द्यावा, अशी विनंती दिल्ली हॉयकमांडला केली असल्याची माहिती आहे.

राज्यातील सहा विधान परिषदांपैकी काही जागा बिनविरोध करण्यात आल्या. पण, नागपुरात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसकडून रविंद्र भोयर यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. काँग्रेसने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक यांना पक्षात घेऊन विधानपरिषेदसाठी संधी दिली. त्यामुळे पक्षातील काहीजण नाराज असल्याचेही बोलले जाते. भोयर प्रचार करीत नाहीत. तसेच मतदारांची भेट घेत नाही. ते निष्क्रीय झाल्याचे काँग्रेसला समजले आहे. त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी समर्थन जाहीर करावे यासाठी दिल्ली हायकमांडला परवानगी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन दिवसांपासून पशुसंवर्धनमंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी निवडणुकीचे सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. काल रेडिसन ब्लू आणिर हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे काँग्रेसच्या दोन बैठका झाल्या. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख देखील उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस उमदेवार बदलणार असल्याच्या चर्चांनी आणखी जोर धोरल आहे.

दरम्यान उमेदवार बदलण्याच्या चर्चा खोट्या आहेत. याविरोधात संबंधितांवर अवमान याचिका दाखल करणार आहोत. काँग्रेसला समर्थन जाहीर करण्यासाठी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखला बैठकीला बोलावले होते. ही दिशाभूल करण्यामागे भाजपचा हात असल्याचे रविंद्र भोयर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; धरणात 92.70 टीएमसी पाणीसाठा : पावसाचा जोर ओसरला

Gold Price Forecast : अमेरिका-इराण संघर्षाचा सोन्या-चांदीवर परिणाम; सोन्याच्या दरावर दबाव कायम, भाव आणखी वाढणार?

Amit Shah NUC FDC: राज्यात नागरी सहकारी वित्त महामंडळ, अमित शहा यांची घोषणा, शहरी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

PMC Tree Cutting Issue : बांधकामासाठी ५०० झाडं तोडली, पण ३५०० कुठे लावली? नियमबाह्य वृक्षतोडीवरून पुणे महापालिकेची कोंडी

SCROLL FOR NEXT