नागपूर

Congress on Ram Mandir: 'काँग्रेसने सर्वसमावेश होण्याची संधी गमावली', भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांकडून काँग्रसला टोला

देशातील दहाबारा टक्के लोकांना खुश करण्यासाठी काँग्रेस अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्‍घाटनाचे निमंत्रण नाकारल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला.

सकाळ डिजिटल टीम

Congress Refused Ram Mandir Invitation: देशातील दहाबारा टक्के लोकांना खुश करण्यासाठी काँग्रेस अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्‍घाटनाचे निमंत्रण नाकारल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी त्यांनी स्व. राजीव गांधी यांनी राममंदिराबाबत घेतलेल्या भूमिकाचाही काँग्रेसला विसर पडल्याचे सांगितले. ‘अयोध्या‘ या हिंदी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी ते नागपूरला आले आहेत. माध्यमांसोबत बोलताना भांडारी म्हणाले, अयोध्येत राममंदिर व्हावे ही कोट्यवधी हिंदू समाजाची इच्छा होती.

ती आता पूर्ण झाली आहे. मंदिराचे उद्‍घाटन नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने करावे अशी इच्छा न्यासाची होती. हा काही भाजपचा व राजकीय कार्यक्रम नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहेत. मात्र काँग्रेसने निमंत्रण नाकारून सर्वसमावेशक होण्याची संधी नाकारली.

भारतातील ८८टक्के हिंदूऐवजी त्यांना कुठल्या समाजाला खुश ठेवायचे आहे यावरून दिसून येते असाही टोला भांडारी यांनी लागवला. निवडणूक आटोपल्यानंतर बहुमताने जो पंतप्रधान होतो तो कुठल्या एका पक्षाच नसतो तर संपूर्ण देशाचा असतो. मात्र काँग्रेस मोदी यांना पंतप्रधान मानत नाही. राष्ट्रपती यांच्याबाबतही त्यांचे हेच धोरण आहे. याचा अर्थ काँग्रेस संविधानाला मानत नाही, घटनेपेक्षा स्वतःला मोठे समजते, असा होत असल्याचे भांडारी म्हणाले. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे अडचणीत
उद्धव ठाकरे यांना राममंदिराचे श्रेय घ्यायचे आहे, दुसरीकडे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडायचे नाही. त्यामुळे त्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. त्यांना कोणासोबत राहायचे आणि कुठे जायचे हा निर्णय उद्घव ठाकरे यांना घ्यायचा असल्याचे भांडारी यावेळी म्हणाले.

शंकराचार्यांची भूमिका नेहमीच विरोधी
हिंदू धर्मात इमारत व मूर्तीपेक्षा स्थानाला अधिक महत्त्व आहे. अयोध्या येथील मंदिरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय असंख्य साधू, संतांनी घेतला आहे. त्यामुळे शंकाराचार्य काय म्हणतात याला फारसे महत्त्व नाही. त्यांनी यापूर्वीसुद्धा राम मंदिराच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता याकडे माधव भांडारी यांनी लक्ष वेधले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Delhi Tragedy : ‘तू ड्रामा करता है...’ असे म्हणत शिक्षकांनी छळलं!, अवघ्या १५ वर्षीय शौर्यला सरांनीच टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त केलं; चिठ्ठीतून उलगडा

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर

Headache Relief: औषधांशिवाय डोकेदुखीवर मिळवा आराम ! घरच्या घरी आजच करा 'हे' 9 सोपे उपाय

IND vs SA, 2nd Test : भारत पुन्हा टॉस हरला; दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; गिलच्या जागी कुणाला संधी? पाहा टीम इंडियाची प्लेईंग XI

Mumbai Local Megablock: रेल्वेमार्ग रविवारी मंदावणार! बेलापूर आणि पनवेलदरम्यान विशेष ब्लॉक; वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT