mahaVikas aaghadi
mahaVikas aaghadi mahaVikas aaghadi
नागपूर

‘आघाडीचा धर्म पाळा’; कॉंग्रेसचे सेना, राष्ट्रवादीला आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कँग्रेसच्या (congress) नेत्यांमार्फत विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात (Legislative Council elections) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (national congress party) पदाधिकाऱ्यांसोबत अखेर संवाद साधण्यात आला. महाविकास आघाडीचे स्मरण करून देऊन सर्वांना काँग्रेसचे उमेदवार डॉ. रवींद्र भोयर (ravindra bhoyar) यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

पालकमंत्री नितीन राऊत यांच्या कॉटेज क्रमांक पाचवर आज निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री रमेश बंग, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे तर शिवसेनेच्यावतीने रामटेकचे खासदार कृपाल तुमाने तसेच आमदार आशिष जयस्वाल यांना चर्चेला बोलवण्यात आले होते.

शिवसेनेकडे (shiv sena) २७ तर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे २४ मतदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतर्फे अद्याप कुठल्याही काँग्रेस नेत्याने तसेच उमेदवाराने संपर्क साधला नसल्याचे सांगण्यात येत होते. कालपर्यंत हीच स्थिती कायम होती. त्यामुळे काँग्रेसला आमच्या मतांची गरज नसावी असे सेना व राष्ट्रवादीचे मतदार बोलत होते.

काँग्रेसचे मतदारसुद्धा आपण उमेदवाराला अद्याप बघितले नसल्याचे खासगीत सांगत होते. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक सोडल्याचे चित्र दिसत होते. याचा फायदा घेत भाजपने अपप्रचार सुरू केला होता. काँग्रेस उमेदवार बदलणार असल्याच्याही अफवा पसरविली होती. नाचक्की होऊ नये म्हणून काँग्रेस नेत्यांनी आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत संपर्क साधला असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT