नागपूर

काँग्रेसला वाटत असल्यास शहराध्यक्ष बदलावा

राजेश चरपे

नागपूर : मी सात वर्षांपासून शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहो. याबाबत कोणाचेच दुमत नाही. पक्षाला वाटत असेल तर त्यांनी नवीन अध्यक्ष द्यावा. आपली काहीच हरकत नाही, असे सांगून शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी पक्षांतर्गत विरोधकांनाच एक प्रकारे आव्हान दिले.

अध्यक्ष कोणाला करायचे, कोणाला थांबवायचे याचा निर्णय पक्ष घेत असतो. आपण कोणालाच निर्णय घेण्यापासून रोखले नाही. आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात केंद्रात आणि पाच वर्षे राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा कोणीच शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली नाही. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता येताच अध्यक्ष बदलण्याची मागणी केली जात आहे.

यालाही काही हरकत नाही. विनाखुर्चीने आपण काम करू शकतो. आमदार म्हणून दक्षिण-पश्चिम नागपूरची जबाबदारी आपल्यावर आहे. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी आपली नेमणूक केली आहे. ही नियुक्तीसुद्धा पक्षानेच केली आहे, असे सांगून ठाकरे यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे बोलले जाते.

नाराजांना दिलासा

प्रदेश काँग्रेसने अधिकाधिक युवा नेत्यांना संधी दिली आहे. सर्वांना अपेक्षित काही नावांचा त्यात समावेश नसला तरी कार्यकारिणी सर्वसमावेशक आहे. लवकरच तुम्हाला सर्व चेहरे प्रदेश कार्यकारिणीत दिसतील असे सांगून विकास ठाकरे यांनी नाराजांना इशारा दिलासा दिला. यावेळी कार्यकारिणीत समावेश नसल्याने नाराज असलेले अतुल कोटेचा, शिरीष पांडव प्रामुख्याने उपस्थित होते.

वाद नव्हे लोकशाही

रविवारी पूर्व नागपूरमध्ये ब्लॉक कमिटीच्या बैठकीत कुठलाच राडा झाला नाही. प्रसार माध्यमांनी चुकीची बातमी प्रकाशित केल्याचा दावा विकास ठाकरे यांनी केला. याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये लोकाशाही आहे, सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळेच काँग्रेस जिवंत असल्याचे सांगून बैठकीत गोंधळ झाल्याचे अप्रत्यक्षपणे ठाकरे यांनी मान्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT