congress vikas thakre and rajendra mulak Resignation form post politics nagpur  sakal
नागपूर

ठाकरे, मुळक यांचे राजीनामे; काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांचा शोध सुरू

काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात झालेल्या ठरावानुसार आमदार विकास ठाकरे यांनी शहर काँग्रेसच्या तर राजेंद्र मुळक यांनी ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

राजेश चरपे

नागपूर : काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात झालेल्या ठरावानुसार आमदार विकास ठाकरे यांनी शहर काँग्रेसच्या तर राजेंद्र मुळक यांनी ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला नव्या अध्यक्षांचा शोध घ्यावा लागणार आहे. मात्र महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत प्रभारी म्हणून दोन्ही अध्यक्ष कायम राहतील असे दिसते. शहरातून आमदार अभिजित वंजारी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र एक व्यक्ती एक पद त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. ते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि विधान परिषदेचे प्रतोद आहेत. ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून उमरेडचे आमदार राजू पारवे यांचे नाव समोर येऊ शकते. मात्र ते मुळक गटाचे आहेत.

त्यामुळे पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार त्यांच्या नावाला पसंती देतील असे दिसत नाही. त्यामुळे ग्रामीणमध्ये सुरेश भोयर यांच्या नावाला केदार कौल देतील असा अंदाज वर्तविला जात आहे. उदयपूर येथील शिबिरात ‘एक व्यक्ती एक पद' तसेच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्यांनी राजीनामा द्यावा असा ठराव झाला होता. त्यानुसार राज्यातील एकूण १७ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विकास ठाकरे यांनी सुमारे साडेआठ वर्षे तर मुळक यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. आता नवा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शहराचा अध्यक्ष निवडताना आमदार विकास ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ आला रे आला! रितेश देशमुखची ग्रँड एंट्री

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

IND vs NZ: किंग कोहलीची घौडदौड कायम; रचला आणखी एक विश्वविक्रम; सचिन तेंडुलकर, संगकाराला टाकलं मागे

Employees DA: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT