consensual relationship is not rape supervision of High Court nagpur bench  Sakal
नागपूर

Nagpur Crime : सहमतीने संबंध बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; तरुणाला मिळाला दिलासा

आरोपी व पीडितेची फेसबुकवरून मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे प्रेमात रुपांतरण झाले व कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्नाचाही निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तरुण व तरुणीमध्ये सहमतीने शारीरिक संबंध असल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविले.

या प्रकरणात तरुणाला दिलासा मिळाला असून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने त्याच्यावरील गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपीने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती.

या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. आरोपी व पीडितेची फेसबुकवरून मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे प्रेमात रुपांतरण झाले व कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्नाचाही निर्णय घेतला.

मात्र, काही कारणास्तव लग्न मोडले. यावर तरुणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला होता. तो न्यायालयाने चुकीचा ठरवित त्याच्याविरुद्धचा गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच, बलात्कार आणि सहतीने शारीरिक संबंध ठेवणे यात बराच फरक असल्याचेही न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे.

अशा प्रकरणात खोटे बोलून किंवा फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित झालेत का? हे तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते. जर आरोपीचे उद्दिष्ट फक्त संबंध ठेवणे असेल आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून फसवले असेल तर तो बलात्कार समजला जाईल.

मात्र, त्याच्या हेतूमध्ये दोष असल्याचे सिद्ध होत नसल्यास किंवा लग्नाचा शब्द देऊन भविष्यात काही कारणास्तव आरोपीने लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार मानला जाणार नाही. काही प्रकरणांमध्ये स्री किंवा तरुणी स्वत: प्रेमातून शारीरिक संबंधांना मंजुरी देते.

अशा प्रकरणांना बलात्काराच्या वर्गवारीत समाविष्ट करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने या प्रकरणात नोंदविले आहे. याचिकाकतर्फे ॲड. राजेश नायक यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT