आठ महिन्यांपासून थंडबस्त्यात असलेल्या वेणा नदीवरील पुलाच्या कामाला झालेली सुरुवात
आठ महिन्यांपासून थंडबस्त्यात असलेल्या वेणा नदीवरील पुलाच्या कामाला झालेली सुरुवात 
नागपूर

गुमगावच्या पुलाच्या बांधकामाने घेतला वेग; आठ महिन्यांपासून थंडबस्त्यात होते काम

रवींद्र कुंभारे

गुमगाव (जि. नागपूर)  :  येथील वेणा नदीवरील जूना पूल पाडून १० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पुलाच्या बांधकामाचे २१ डिसेंबर,२०१८ रोजी आमदार समीर मेघे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. मोठ्या जोमात सुरू करण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम मात्र गेल्या आठ महिन्यांपासून थंडबस्त्यात गेल्याने परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि वाहनधारक कमालीचे संतापले होते.

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या गुमगाव येथील वेणा नदीवरील अर्धवट पुलामुळे वाहनधारकांना होणाऱ्या समस्यांचा 'ऑन द स्पॉट' लेखाजोखा 'अर्धवट पुलाची गाथा' 'सकाळ'मध्ये प्रकाशित होताच अर्धवट पुलाच्या बांधकामाला पुन्हा एकदा जोमात सुरुवात झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला गती येताच नागरिकांनी 'सकाळ'चे अभिनंदन करून सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

अधिक माहितीसाठी - Big Breaking : वाढदिवस साजरा करायला गेले, पण वाटतेच काळाने घातला घाला, कारच्या भीषण अपघातात ४ ठार, एक जखमी


वेणा नदीवरील पूल थंडबस्त्यात, अर्धवट रस्त्याचा सांगा फायदा तरी काय ?,जपून रे दोस्ता, धोक्याचा रस्ता !,अर्धवट पुलामुळे बिघडले 'आर्थिक' बजेट, अर्धवट पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना !, अर्धवट पुलामुळे पर्यायी रस्त्यांची लागली 'वाट' यासारख्या बातम्यांची मालिकाच 'सकाळ'मध्ये प्रकाशित होताच संबंधित विभागाने दखल घेत पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. 


गेल्या आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेल्या गुमगावच्या वेणा नदीवरील पुलाच्या बांधकामाला सध्या जोमात सुरुवात झाली आहे. संबंधित विभागाने शक्य तितक्या लवकर पुलाचे बांधकाम पूर्ण करून वाहनचालकांची डोकेदुखी दूर करावी. 
-  सुभाषराव लोडे (पाटील) 
सरपंच,वडगाव-गुजर 


‘सकाळ'ने सुरू केल्या 'अर्धवट पुलाची गाथा' या मालिकेमुळेच पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. 'सकाळ'चे खूप खूप अभिनंदन. 
- रवींद्र आष्टनकर 
माजी सरपंच, कोतेवाडा 


पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने सध्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आलेले आहे. पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण झाल्यास शेतकरी, शेतमजूर, कामगार, दुग्धव्यवसायिक, वाहनचालकांना होणारी गैरसोय दूर होईल. 
- नितीन बोडणे 
उपसरपंच, गुमगाव 


अभिनंदन 'सकाळ'.आपण सुरू केलेल्या 'अर्धवट पुलाची गाथा' या मालिकेचेच हे यश आहे. पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होईपर्यंत आपण चालविलेल्या बातम्यांच्या मालिकेसाठी खूप खूप धन्यवाद! 
- अरविंद वाळके 
सामाजिक कार्यकर्ते. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: निकाल येण्याआधी मानली हार? सुळेंनी ५० हजारांचं लीड घेताच सुनेत्रा पवारांच्या विजयाचे लावलेले बॅनर काढले

Lucknow Lok Sabha Result: भाजपच्या बालेकिल्ल्यात राजनाथ सिंहांची हॅट्रिकच्या पक्की, घेतली लाखांची आघाडी

Mumbai Lok Sabha election result 2024 : सभा घेतली, रोड शो केला.. तरीही मोदींचा करिष्मा चालला नाही; मुंबईतली गणितं कुठं चुकली?

India Lok Sabha Election Results Live : सोनिया गांधी यांच्या विक्रम राहुल यांनी मोडला

Maharashtra Lok Sabha Election Results Live : नगरमधून निलेश लंके १५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT