file photo 
नागपूर

भट सभागृहाचा वाद चिघळणार!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : भट सभागृह देण्यास नकार दिल्याची बाब जिल्हा परिषदेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भविष्यात महानगरपालिकेला कोणतेही सहकार्य न करता जागाही न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे दोन्ही संस्थांमधील संबंध बिघडणार असून वाद चिघळण्याची शक्‍यता आहे. 

-महानगरपालिकेने सभागृह देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे पालिकेला कोणतेही सहकार्य न करता जागा ही न देण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतली आहे. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी महानगरपालिकेला दिलेल्या जागांची माहिती सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केली आहे.

विनंती धुडकावल्याने सीईओ योगेश कुंभेजकरही चांगलेच नाराज झाल्याचे समजते. शुक्रवारला त्यांनी काही विभागांच्या बैठकी घेतल्या. यात त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. शांत स्वभावाचे समजले सीईओ चिडचिड करीत असल्याचे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचा राग कर्मचाऱ्यांवर निघाल्याची चर्चा होती. यामुळे भविष्यात सभागृहाचा वाद चिघळणार असल्याचे दिसते. 


जागा देणार नाही 
सभागृह न देणे हे योग्य नाही. महानगरपालिकेला सहकार्य करण्यासंदर्भात विचार करावा लागेल. त्यांना कोणत्याही प्रकारची जागा देण्यात येणार नाही. जिल्हा परिषदेच्या किती जागा पालिकेला देण्यात आल्या, याची माहिती मागविली आहे. सभेत यावर चर्चा करू. 
-मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष व सत्ता पक्ष नेते, जि.प. 

सत्तापक्षाने निर्णय घ्यावा 
हे सत्ता पक्षाचे अपयश आहे. महापालिकेला सहकार्य न करण्यासंदर्भात सत्तापक्षाने निर्णय घ्यावा. 
-अनिल निधान, विरोधी पक्षनेते, जि. प. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT