cooler. 
नागपूर

कोरोनामुळे या व्यवसायावरही संक्रांत; करावे तरी काय?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : उन्हाळा सुरू झाला की घराघरांत कुलर लागतात. कुलर बाजारातही खरेदीदारांची गर्दी उसळते. मात्र, कोरोनामुळे यंदा कुलर मार्केट ठप्प आहे. त्यामुळे कुलरविक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, कुलरअभावी सर्वसामान्य नागरिकांनाही फटका बसत आहे.
दरवर्षी मार्च महिन्यापासून बाजारात कुलर विक्रीस सुरुवात होते. बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, कोरोनाच्या उद्रेकानंतर जमावबंदी टाळण्यासाठी सरकारने अचानक "लॉकडाऊन' केले. तेव्हापासून शहरातील सर्व मार्केट बंद आहेत. अनेक दुकानदार आपली दुकाने बंद करून घरी आहेत. व्यवसाय ठप्प असल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. कोरोनाने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेतले. परिणामत: अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता "लॉकडाऊन' आणखी काही दिवस वाढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची चिंता वाढत आहे. यंदा पावसाळा लांबल्याने उन्हाळा थोडा उशिराच सुरू झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानासोबतच उकाडाही वाढू लागल्याने आता कुलरची गरज भासत आहे. परंतु, विक्री व दुरुस्तीची दुकानेच बंद असल्याने अनेकांना सध्या कुलरविना दिवस काढावे लागत आहेत. ज्यांच्याकडे कुलर आहेत, त्यांनी सुरू केले. मात्र, अनेकांकडील कुलर व पंखे नादुरुस्त असल्याने त्यांची अडचण आहे.

उपासमारीची वेळ
कोरोनाच्या फैलावानंतर सरकारने 22 मार्चला "लॉकडाउन' घोषित केले. तेव्हापासून दुकाने बंद आहेत. कुलरविक्रीवर आमचा उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र, सध्या व्यवसाय ठप्प असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. माझ्यासह सारेच कुलरविक्रेते चिंतित आहेत.
ललित डंभारे, कुलरविक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT