Coolers for animals in gorewada rescue center in Nagpur  
नागपूर

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वन्यप्राण्यांची शाही बडदास्त; उन्हापासून संरक्षणासाठी लावले कुलर 

राजेश रामपूरकर

नागपूर ः राज्यातील उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. या उन्हाचा चटका माणसांबरोबरच प्राण्यांना देखील बसत आहे. यामुळेच गोरेवाडा रेस्क्यू सेंटर आणि प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांसाठी कुलिंग व्यवस्था बसवण्यात आली आहे. 

उन्हाळ्याची तीव्रतेमुळे वन्यप्राण्यांना उष्माघात, गॅस्ट्रो आणि डायरिया होण्याची शक्यता लक्षात घेऊन दरवर्षी पिंजऱ्यातील हिंस्र प्राण्यांना कुलरच्या थंडाव्यात ठेवण्यात येत आहे. यंदाही वाघ, बिबट आणि अस्वलासाठी विविध ठिकाणांवर एकूण नऊ कुलर लावण्यात आलेले आहेत. तीव्र उन्हामुळे हिरव्या जाळ्यांची आच्छादने टाकण्यात आली आहेत. हरणांच्या कळपांना संरक्षण देण्यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

पिंजऱ्यात ठेवलेल्या वाघिणी, बिबट आणि अस्वलांना दुपारी उन्हाचा त्रास होऊ नये, यादृष्टीने डेझर्ट कुलर बसविण्यात आले असून त्यात पाणी टाकण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध उपाययोजनांद्वारे या प्राण्यांचे उन्हापासून बचाव करण्यासोबतच संग्रहालयातील हिरवाई जपण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

उन्हाळ्यात प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांना रोजच्या आहारात तसेच ग्लुकोजचे पाणी आणि ‘ड’ जीवनसत्त्वही दिले जात आहे. हिंस्र प्राण्यांच्या तसेच पक्ष्यांच्या पिंजऱ्यांभोवताली थंडाव्यासाठी हिरव्या जाळ्यांचे आच्छादन लावण्यात आले आहे, असे विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई यांनी सांगितले. महाराजबाग प्राणिसंग्रहालयातही उन्हाच्या त्रासापासून बचावासाठी विविध उपाय करण्यात आले आहेत. 

गोरेवाडा पर्यटन सुरू 

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालय आणि निसर्ग सफारी पर्यटन गेल्या पंधरा दिवसापासून टाळेबंदीमुळे बंद करण्यात आले होते. आता मिशन बिगेन अगेन या अंतर्गत ते पुन्हा दोन एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना कोविडचे नियम पाळावे लागणार आहे. त्यात मास्क आवश्यक असून आजारी व ज्येष्ठ नागरिकांना पर्यटनावर बंधने घातली आहे. 

संपादन- अथर्व महांकाळ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT