corona and sari patients admitted in same ward of government medical college nagpur  
नागपूर

'मेडिकल'च ठरतेय कोरोनाचे हॉटस्पॉट, कोरोनाबाधित अन् सारीचे रुग्ण एकाच वॉर्डात

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाचा प्रकोप वाढला असल्यामुळे खाटांची संख्या वाढवण्यासाठी मेडिकल प्रशासनाचा आटापिटा सुरू आहे. यामुळे आज एक निर्णय घेतला, तर दुसऱ्या दिवशी दुसराच निर्णय घेण्यात येतो. यातूनच चुकीचे निर्णय घेण्यात येत आहेत. कोरोनाबाधितांच्या वॉर्डात नॉन कोविड (सारी) रुग्णांना हलवताना वॉर्ड सॅनिटाईज करण्याचा कोणताही प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे मेडिकलच कोरोना संसर्ग पसरविण्याचे हॉटस्पॉट तयार होत असल्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. 

मेडिकलमध्ये कोरोनाची संख्या वाढत असल्याने दर दिवसाला नवीन वॉर्ड तयार करण्यात येत आहे. गुरुवारी (ता.२५) कोविड वॉर्डातील (वॉर्ड क्रमांक १३) कोरोनाबाधित रुग्णांना वॉर्ड क्रमांक २ मध्ये हलवण्यात आले. एकाचवेळी सर्व कोरोनाबाधित रुग्णांना हलवणे आवश्यक होते. मात्र, एकूण ५५ कोरोनाबाधितांपैकी ६० टक्के रुग्ण वॉर्ड २ मध्ये हलवले. उर्वरित काही कोरोना रुग्ण वॉर्ड क्रमांक १३ मध्ये मागच्या ब्लॉकमध्ये ठेवण्यात आले. त्यांना रात्री अपरात्री किंवा सकाळी हलवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या वॉर्डात अर्ध्या भागात सारीच्या (वॉर्ड दोन) वॉर्डातून हलवण्यात आलेले नॉन कोविड (सारी) रुग्ण आहेत. सारी आणि कोरोनाचे रुग्ण एकत्र असल्यामुळे संसर्गाची लागण होण्याची भीती आहे. सारीच्या रुग्णांना कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एका जागरूक नातेवाईकाने ही तोंडी तक्रार प्रशासनाकडे केली. मात्र, याकडे कोण्या अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. विशेष असे की, हीच स्थिती सारीच्या वॉर्ड क्रमांक २ मध्ये आहे. यामुळे येथेही कोरोनाबाधितांकडून सारीच्या रुग्णांसाठी धोक्याची घंटा आहे. यासंदर्भात संबंधित अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी रुग्णांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत वॉर्ड १३ मधील सर्व कोरोनाबाधितांना वॉर्ड २ मध्ये हलवण्यात येईल. याशिवाय वॉर्ड सॅनिटाईज करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानची संगीत खुर्ची! मोहम्मद रिझवानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून २५ वर्षीय खेळाडूला केलं कॅप्टन

Kolhapur CBS Rada : कोल्हापूर सीबीएसवर एसटी नसल्याने प्रवासी संतापले, जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय प्रकरण

'गुप्तांगाला स्पर्श करणेही बलात्कारच'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय; ड्रायव्हरने दोन मुलींवर केला होता अत्याचार

Ichalkaranji Politics : निमित्त दिवाळी शुभेच्छा, कोल्हापूरचे दादा, इचलकरंजीच्या आण्णांना भेटले; मिशन झेडपी ते महापालिका काय झाली चर्चा...

SLW vs BANW: २ धावांत ५ विकेट्स पडल्या अन् बांगलादेशने हातचा सामना गमावला; श्रीलंकेने विजयासह आव्हान कायम राखले

SCROLL FOR NEXT