Corona can also occur through the eyes : Dr. Viral Shah 
नागपूर

बापरे आता हे काय, डोळ्यांतूनही होऊ शकतो कोरोना

राजेश चरपे

नागपूर  : कोविड हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यांसह डोळे येणे हेसुद्धा कोविडचे एक लक्षण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डोळ्यांचीही काळजी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक तसेच ग्रीन सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राफत खान आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व नियाक्षी आय हॉस्पिटलचे डॉ. विरल शाह यांनी दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड संवाद’ या ‘फेसबुक लाइव्ह’ कार्यक्रमात डॉ. राफत खान आणि डॉ. विरल शाह यांनी बुधवारी (ता. ३०) ‘कोविड आणि डोळ्यांची निगा’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी शंकांचे निरसनही केले.

कोविड हा अत्यंत धोकादायक आजार आहे. त्यामुळे त्याला अगदी सहज घेऊ नका. कोविडमुळे ज्या पहिल्या डॉक्टरांचा मृत्यू झाला ते नेत्र शल्यचिकित्सक होते. त्यामुळे डोळ्यांमधून होणारा संसर्ग हा नाक आणि तोंडातून होणाऱ्या संसर्गाएवढाच घातक आहे. डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळा. 

अनेक जण ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ लावतात. मात्र, ते लावताना आधीपेक्षा जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. कॉन्टॅक्ट लेन्स लावण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. सॅनिटायझरचा वापर करून शक्यतो डोळ्यांना हात लावू नका. शक्य असल्यास चष्मा वापरा. स्वत:च्या मताने डोळ्यांबाबत कुठलेही उपचार करू नका. दवाखान्यात जाणे शक्य नसल्यास फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही आवाहन यावेळी डॉ. राफत खान आणि डॉ. विरल शाह यांनी केले. 

संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT