Corona Death rate in Nagpur is getting high today 58 deaths  
नागपूर

उपराजधानीत कोरोना मृत्यूतांडव; आज तब्बल ५८ जणांनी गमावला जीव; नवे  ३ हजार ९७० बाधित 

केवल जीवनतारे

नागपूर ः जिल्ह्यात कोरोनाचा विषाणू आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाही. विषाणूची प्रादुर्भाव साखळी अधिक गहिरी होत आहे. जिल्ह्यातही विस्फोट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या बाधितांसह मृत्यूची साखळी वेगाने विस्तारली जात आहे. ही चिंताजनक बाब असून गुरुवारी ३ हजार ९७० इतक्या विक्रमी संख्येची नोंद झाली. तर या सगळ्या घटनाक्रमात जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हाफ सेंच्युरीपेक्षा अधिक मृत्यू झाले. मागील २४ तासांमध्ये ५८ मृत्यू नोंदवले गेले.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव झाल्यानंतर दगावलेल्यांपैकी ३७ एकट्या शहरातील असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८ आणि जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंतचा मृत्यूचा आकड्याची वाटचाल ५ हजाराच्या दिशेने सुरू झाली आहे. 

जिल्ह्यात झालेल्या ४ हजार ९३१ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंत शहरातील आजपर्यंत ३ हजार १५३ तर ग्रामीण भागातील ९३५ आणि जिल्ह्याबाहेरील ८४३ मृतांचा समावेश आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये २ हजार ९५० जण शहरातील आहेत, तर ग्रामीण भागातील १ हजार १७ जण आहेत. यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १८ हजार ८२० वर पोहोचली आहे. 

यात शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ७२ हजार ७६० तर ग्रामीण ४५ हजार ३५ आहे. जिल्ह्याबाहेरील १ हजार २५ जणांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. रविवारी (ता.२८) दिवसभरात शहरात २ हजार ८२४ तर ग्रामीण भागातील ६५५ अशा एकूण ३ हजार ४७९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ४२ हजार ७१० तर ग्रामीण भागातील ३३ हजार ४०३, अशा एकूण १ लाख ७६ हजार ११३ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.

बाधितांचे २४ टक्के प्रमाण धोकादायक

जिल्ह्यात १६हजार १५५चाचण्या झाल्या आहेत. यातील शहरात १० हजार ९४५ तर ग्रामीण भागात ५ हजार २१० चाचण्या झाल्या आहेत. यांचा अहवाल सोमवारी अपेक्षित आहे. मात्र शनिवारी जिल्ह्यात झालेल्या १६ हजार ५३५ नमुन्यांमध्ये ३ हजार ९७० कोरोनाबाधित आढळून आले. कोरोना सकारात्मक अहवालाचे प्रमाण २४ टक्के झाले. ही अतिशय चिंताजनक परिस्थिती नागपुरात निर्माण झाली आहे.

-जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजारावर
-जिल्ह्यात गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या ३२ हजार ९००
-आजचे पॉझिटिव्ह- ३ हजार ९७०
-आजचे मृत्यू -५८
-आत्तापर्यंत एकूण मृत्यू ४ हजार ९३१
-आतापर्यत पॉझिटिव्ह- २ लाख १८ हजार ८२०
-आज तपासलेले नमुने- १६ हजार १५५ चाचण्या
-आज झालेले कोरोनामुक्त- ३ हजार ४७९
-एकूण कोरोनामुक्त- १ लाख ७६ हजार ११३ 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT