file photo 
नागपूर

उपराजधानीतील तीन पोलिसांना कोरोनाची लागण...प्रशासनाने घेतला धसका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाची अनेकांना बादा जाल्याने नागपूर रेड झोनमध्ये गेला आहे. पार्वतीनगर येथील 22 वर्षीय युवक कोरोनामुळे दगावल्यानंतर काही पोलिसांची चाचणी करण्यात आली होती. त्यात एकही पोलिस बाधित आढळला नाही.

मात्र मागील 65 दिवसांपासून अहोरात्र रस्त्यावर कर्तव्यावर असलेले नागपूर पोलिस कोरोनामुक्त होते. परंतु, शनिवारी शहरात तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतून स्पष्ट झाले आहे.

पोलिस प्रशासन हादरले

उपराजधानीत गोरेवाडा, कामठी मार्गावरील हरीनगर तसेच तहसील परिसर येथील तिघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल पशुवैद्यक प्रयोगशाळेतून आल्यानंतर पोलिस प्रशासन हादरले आहे. या पोलिसांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांच्या कुटुंबांना विलगीकरणाची चिंता

त्यांच्या संपर्कातील पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. कर्तव्य सांभाळणाऱ्या पोलिसांना बाधा झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही विलगीकरणाचा वनवास येणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मोमीनपुरा येथे होते कर्तव्यावर

तिन्ही पोलिसांपैकी 48 वर्षीय पोलिस मुख्यालयात, 35 वर्षीय पोलिस पोलिस नियंत्रण कक्षात, तर 42 वर्षीय पोलिस तहसील परिसरात कर्तव्यावर होता. ते मागील आठ दिवसांपासून मोमीनपुरा येथे कर्तव्यावर होते. यादरम्यान तिघांपैकी कुणाचा तरी कोरोनाबाधिताशी संपर्क आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT