file photo
file photo 
नागपूर

गावात आला कोरोना रुग्ण; मग घडले हे...

सकाळ वृत्तसेवा

कोदामेंढी (नागपूर) : नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या पांढराबोडी (जि. भंडारा) येथील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती काही कामानिमित्त कोदामेंढी येथे आल्याने गावात धावपळ माजली. या कारणाने गावातील बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. 

मौदा तालुक्‍यात अद्याप कोरोनाचा शिरकाव नाही. मात्र, एक पॉझिटिव्ह रुग्ण कोदामेंढी गावात येऊन गेल्याचे माहीत होताच नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोना रुग्णांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. मध्यवर्ती कारागृहात पोलिस शिपाई पदावर कार्यरत असलेली व्यक्ती दोन दिवसांच्या सुटीवर स्वतःच्या गावाकडे पांढराबोडी (जि. भंडारा) येथे आली. त्यानंतर ते कोदामेंढी येथे दुचाकी घेण्याकरिता गेले. एका ठेल्यावर पाणीपुरीही खाल्ली. गावाकडे येण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने स्थानिक प्रशासनात धावपळ माजली. 

आरोग्य विभागाने ऑटोमोबाईल आणि पाणीपुरी दुकानदार यांना दहा दिवसांकरिता होम क्वारंटाइन राहण्याचे आदेश तसेच काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला कळविण्याची सूचना दिल्या आहेत. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून खबरदारी बाळगत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

संपर्कातील व्यक्तींनी काळजी घेणे आवश्‍यक 
जिल्ह्यात मौदा तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव सध्या तरी नाही. पण, सदर पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांच्या संपर्कात आलेला आहे, त्यांनी काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आणि बेजबाबदारपणे वागल्यास तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT