नागपूर

महिलेचा जीव गेला अन् पडले पितळ उघडे; वाढोणा कोरोनामुक्त कसा?

अनिल ढोके

मोवाड (जि. नागपूर) : कोरोना महामारीने (Corona patient) अख्या देशाला हैराण करून सोडले. नगर, शहर, गावांनाही त्रस्त करून सोडले. त्यातच काही शहरे आकडे लपवित आहेत, तर काही गावे स्वताचीच पाठ थोपटून घेत आहेत. अशाच एका प्रकरणावरून नरखेड तालुक्यातील वाढोणा गावचे पितळ उघडे पडले. वाढोणा गावातील सरपंच, उपसरपंच व गावातील पदाधिकाऱ्यांनी वाढोणा गाव हे कोरोनामुक्त (wadhona village is corona free) झाल्याची नेते व अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, परिस्थिती वेगळी असल्याचे नुकत्याच एका घटनेवरून सिद्ध झाले अन् गावाचे पितळ उघडे पडले. हल्ली गावात १२ रुग्ण असून एका बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. (Corona-patient-information-hidden-in-Wadhona-village-in-Nagpur-district)

केवळ प्रसिध्दीसाठी हा सर्व आटापिटा सुरू असल्याची गावकऱ्यांत चर्चा आहे. कार्यक्रमाला उपस्थित पं. स. सदस्य सुभाष पाटील यांच्या हस्ते गावातील आशावर्कर व अंगणवाडीसेविका यांचा सत्कार करण्यात आला. या गावातील सरपंच व तथाकथित नेते यांना सत्कार करण्याची लगीनघाई झाली होती. याच गावात प्रिया किशोर बोडखे या महिलेचा कोरोना महामारीने ९ मे २०२१ या तारखेला मृत्यू झाला.

जेमतेम २० ते २१ वर्षांच्या महिलेने तिच्या पाठीमागे पती किशोर बोडखे, केवळ दोन महिन्याचे निरागस बाळ मागे सोडले आहे. परिवाराला आर्थिक सहकार्याची गरज असताना राजकारण्यांना सत्कारच करण्याची लगीनघाई होती का, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पण, गावातील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी या परिवाराकडे साफ दुर्लक्ष केले असून गावाचा सत्कार करून घेण्यातचं खुश होत.

शासनाने ‘कोरोनामुक्त गाव’ व त्या गावांना केलेली बक्षिसांच्या घोषणेचा आपल्या गावाला फायदा झाला पाहिजे की काय, म्हणून काही नरखेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी गावात आशा वर्कर, मदतनीस व ग्रामपंचायत चपराशी यांचा सत्कार करून घेतला. या गोष्टीचा काही वृत्तपत्रांत गाजावाजा करून घेतला. गावात येवढे कोरोना रुग्ण आढळून आले आहे की एका रुग्णाचा मृत्यूसुध्दा झाला. हल्ली जवळपास दहा रुग्ण गावात पॉझिटिव्ह आहेत, तरी वाढोणा गाव कोरोनामुक्त कसे, असा प्रश्न सुज्ञ गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

चिमुकले बाळ झाले पोरके

वाढोणा गावातील किशोर बोडखे व प्रिया यांनी एक वर्षाआधी संसार थाटला. प्रियाने निरागस बाळाला जन्म दिला. परिवारात आनंदाचे वातावरण होते. पण नियतीला हे मान्य नव्हते. या निर्दयी कोरोनाने प्रियाला आपल्या तावडीत जखडले व सुरू झाला तिचा कोरोनाशी लढा. काही दिवसांचे चिमुकले बाळ आणि कोरोनाची लागण झालेली चिमुकल्याची आई प्रियाने ९ मे रोजी जगाचा निरोप घेतला. मरणाआधी तिने त्या बाळाचे नाव आदित्य ठेवले होते. आदित्य म्हणजे सूर्य. प्रियाने बोडखे परिवाराला आदित्य नावाचा प्रकाश तर दिला. मात्र स्वत: अंधारमय दुनियेत निघून गेली. सावंगी मेघे येथील दवाखान्यातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

(Corona-patient-information-hidden-in-Wadhona-village-in-Nagpur-district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT