corona patient 
नागपूर

नागपुरात अब तक 56, सत्तरीतील वृद्धासह एका चिमुकलीला सुद्धा कोरोनाची बाधा 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : आज अवघ्या काही तासांमध्ये उपराजधानीत 9 कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. यामुळे नागपूर प्रशासनाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. 

राज्याची राजधानी वेगाने कोरोनाबाधित होत असताना उपराजधानीतही कोरोनाग्रस्तांचा आकडा फुगत चालला आहे. शहरात मंगळवारी 9 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. यामुळे नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या 56 वर पोहचली आहे. विशेष असे की, मागील पाच दिवसांत उपराजधानीत 37 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. सद्या मेयो मेडिकलमध्ये 48 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

शहरात आणखी 9 कोरोनाबाधित आढळले 
सोमवारी मध्यरात्रीनंतर आणि मंगळवारी नागपुरात सिंबॉयसिसमधील सक्तीच्या विलगीकरणातील 6 आणि आमदार निवासातील 3 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती पुढे आली. बहुतांश रुग्ण सतरंजीपुरा परिसरातील आहेत. या रुग्णांत मेडिकलच्या प्रयोगशाळेत 3 तर अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स)च्या प्रयोगशाळेत 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पाचपेक्षा अधिक रुग्ण हे सतरंजीपुरा, दलालपुरा परिसरातील आहेत. तर यातील एक व्यक्ती अजमेर येथून नागपूरमध्ये परतली आहे

या व्यक्तीलाही विलगीकरणात ठेवण्यात आले होते. एम्समध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 7 नमुने कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. तर मेडिकलमधील 3 नमुने कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मेडिकलमधील रुग्णांचे वय अनुक्रमे 58, 18 आणि 8 असे आहेत. तर एम्समधील प्रयोगशाळेतून आलेल्या एका 70 वर्षीय वृद्धासह 19 वर्षाचा युवकही कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. याशिवाय 45 आणि 40 वर्षीय महिलांचा समावेश कोरोना बाधितांमध्ये आहे. हे सर्व सतरंजीपुरा, दलालपुरा या भागातील असल्याची चर्चा आहे. विशेष असे की, दोन रुग्ण आणखी एम्सच्या प्रयोगशाळेतून कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यात 31 नमुन्यांमध्ये 4 कोरोनाबाधित आढळले तर दुसऱ्या टप्प्यात 30 नमुन्यांमध्ये दोघांना बाधा झाले आहेत, असा अहवाल दिला. विशेष असे की, सोमवारी मध्यरात्री बाधितांमध्ये सत्तर वर्षांचा रुग्ण तसेच 8 वर्षांच्या मुलीचा बाधितांमध्ये समावेश आहे. 

23 जण सतरंजीपुऱ्यातील 
शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 23 पेक्षा अधिक रुग्ण हे सतरंजीपुरा परिसरातील आहेत. यामुळे महापालिकेतर्फे या परिसरात मोठ्या प्रमाणात संचारबंदी सुरू आहे. प्रत्येक घरातील व्यक्तीचे स्क्रिनिंग सुरू झाले. परिसरात फवारणी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT