mla 
नागपूर

कोरोनाने पळापळ, आमदार निवासीतील कर्मचारी दहशतीत,डॉक्‍टर-परिचारिका बेपत्ता

नीलेश डोये, केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना विषाणूची दहशत विदर्भात पसरली आहे. नागपूरचे चार जण कोरोनाग्रस्त आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आमदार निवासात विलगीकरण कक्ष तयार केला. विशेष असे की, तीन विदेशातील व्यक्तींना येथे ठेवण्यात आले आहे. यामुळे आमदार निवासातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. या विदेशी रुग्णांच्या आरोग्य सुविधांसाठी डॉक्‍टर, परिचारिकांची नियुक्ती न करता, त्यांच्या सेवेसाठी येथे तैनात कर्मचाऱ्यांवर जबाबदारी येणार असल्याची चर्चा आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याने या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

आमदार निवास येथील विलगीकरणसाठी महसूल यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी खबरदारीचे उपाय म्हणून मास्क व इतर साहित्य पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. मात्र आतापर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. चीनमधून इतर देशातील नागरिकांना याची लागण झाली आहे. या कोरोनाची झळ नागपुरातही पोहचली आहे. 4 जणांना कोरोनाने विळख्यात घेतले आहे. पहिला रुग्ण अमेरिकेतून आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर दोघांना याची लागण झाली. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर स्क्रिनिंग होत असून यासाठी विशेष यंत्र लावण्यात आले आहे. संशयित विदेशी नागरिकांना आमदार निवास येथे विशेष विलगीकरण केंद्रात पाठवण्यात येत आहे. यासाठी आमदार निवासातील दोन इमारतीमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. विदेशी नागरिकांची देखरेख व मदतीकरता महसूल विभागातील 15 ते 18 कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. संसर्गजन्य आजार असल्याने त्याचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे येथे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्‍यक सुविधा म्हणजे मास्क, सॅनेटाईझर, पर्सनल प्रोटेक्‍शन किट पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे.

विशेष म्हणजे या आजारावरील उपायोजनांची माहिती देण्यासाठी येथे डॉक्‍टर, परिचारिका यांची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. परंतु, आरोग्य यंत्रणाच येथे पुरविण्यात आली नाही. येथील रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास कर्मचाऱ्यांना त्याची लागण होण्याची जोखीम आहे. जिल्हा प्रशासनाने फक्त विलगीकरण कक्ष तयार करून आपले हात झटकले असल्याची जोरदार चर्चा येथे आहे.

तीन जर्मन नागरिक
आमदार निवासातील विविध खोल्यांमध्ये तीन विदेशी नागरिकांना ठेवण्यात आले आहे. हे तिन्ही नागरिक जर्मनीतील आहेत. शनिवारी (ता.14) पहाटे या नागरिकांना सिव्हील लाईन येथील आमदार निवासात आणण्यात आले आहे. या नागरिकांना जेवण, पाणी व इतर सुविधा पुरविण्यासाठी महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या बचाव सुविधांसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

Hapus Mango Prices : रत्नागिरी हापूस थेट 1000 रुपये डझन; सोलापूर मार्केट यार्डात आंब्यांचे भाव गगनाला भिडले, कर्नाटकी हापूसचा दर काय?

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

Sangli Gool Bazaar: तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती! सांगलीचा गूळ बाजार १२ दिवसांपासून ठप्प, कोट्यवधींची उलाढाल बंद, कर्नाटकातून आवकही थांबली

IND vs AFG 2nd ODI: नितीश कुमार रेड्डीची निवड का केली नाही? BCCI चे चिंता वाढवणारे अपडेट्स; नवा ओपनर दुसऱ्या षटकात OUT

SCROLL FOR NEXT