कोरोना टेस्ट Sakal
नागपूर

विमानतळ, रेल्वे स्टेशनवर होणार कोरोना टेस्ट

महापालिका ‘ॲक्शन मोड’मध्ये : सुपर स्प्रेडर्सवर नजर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - कोरोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढले असून आज जिल्ह्यात २५ तर शहरात १५ आढळून आल्याने महापालिका ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तातडीची बैठक घेत कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. दिल्ली, मुंबईवरून विमानाने येणारे तसेच रेल्वेने इतर शहरातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ, रेल्वे स्टेशनवर चाचणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातील सुपर स्प्रेडर्सचीही चाचणी करण्यात येणार आहे.

कोरोना बाधितांच्या अचानक वाढलेल्या संख्येमुळे महापालिकेच्या कोरोना वॉररूमध्ये आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतिक खान, डॉ. विजय तिवारी, डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू यांच्यासह इतर झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

हॉस्पिटल्स सज्ज ठेवण्याचे निर्देश

संभाव्य धोका लक्षात घेता हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन प्लांट, औषधे आदी सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. कोरोनावर नियंत्रणासाठी १२ वर्षावरील मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या बूस्टर डोससाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शाळा, महाविद्यालयांत लसीकरण

लसीकरणाचा दुसरा डोस घेतला नसलेल्या नागरिकांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शाळा, महाविद्यालयात शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांचे नर्सेस, डॉक्टरकडून नि:शुल्क लसीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आकडेवारी लसीकरणाची

१८ वर्षांवरील

पहिला डोस घेणारे : १०४ टक्के

दुसरा डोस घेतलेलेः ८४ टक्के

१५ ते १७ वर्षे वयोगट

पहिला डोस घेणारे : ६६ टक्के

दुसरा डोस घेणारे : ५० टक्के

१२ ते १४ वयोगटातील मुले, मुली

पहिला डोस घेणारे : ३९ टक्के

दुसरा डोस घेणारे : १७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT