nagpur lockdown 
नागपूर

नागपुरात कोरोनाचा धोका वाढला, हा परिसर करण्यात आला सिल 

सकाळवृत्तसेवा

नागपूर :  कोरोनाबाधित 14 नवे रुग्ण आढळून आल्याने नागपुरात धोका वाढला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मोमीनपुरा भागाला लागूनच असलेला हंसापुरी परिसरही सिल करण्याचे आदेश काढले. यापूर्वी आयुक्तांनी मोमीनपुरा, सतरंजीपुरा, बैरागीपुरा परिसर सिल केला. कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता आयुक्तांनी नागरिकांना घरांमध्येच राहण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. 

शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41 झाली असल्याने महापालिकेने काही कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली. विलगीकरणात असलेल्या संशयितांमधून आज अचानक 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. यात हंसापुरी परिसरातील रुग्णांचाही समावेश आहे. त्यामुळे आयुक्तांनी रविवारी तडकाफडकी हंसापुरी परिसर सिल करण्याचे आदेश काढले. यापूर्वी 5 एप्रिलला आयुक्तानी मोमीनपुरा सिल करण्याचे आदेश काढले होते. आता याच परिसराला लागून असलेल्या हंसापुरीचेही मार्ग बंद करण्यात आले.

घरांमध्येच राहण्याचे नागरिकांना आवाहन 
उत्तर-पश्‍चिम भागातील मोतीबाग रेल्वे ब्रिज, उत्तर-पूर्व भागातील पाचपावली रेल्वे ब्रिज, दक्षिण पूर्व भागात अग्रसेन चौक, दक्षिण-पश्‍चिम भागातील पोद्दारेश्‍वर राम मंदिर परिसरातून हंसापुरीत शिरण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले. या भागातील नागरिकांना या परिसराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून इतर भागातील नागरिकांनाही या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केवळ तातडीची वैद्यकीय सेवा तसेच अंत्यविधीसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही या प्रतिबंधातून सुट देण्यात आली आहे. डॉक्‍टर, नर्स, औषध विक्रेते दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट यांनाही या बंदीतून वगळण्यात आले आहे. याशिवाय जीवनाश्‍यक वस्तू न सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना पोलिस पासशिवाय या भागात प्रवेश करता येणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. याबाबत महापालिकेने पोलिस आयुक्तांनाही पत्र दिले. 

आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र 
मोमीनपुरा : उत्तर पूर्वेकडील तीन खंबा चौक, दक्षिण-पूर्वेकडील नालसाहब चौक, दक्षिण-पश्‍चिमकडील भगवाघर चौक, पश्‍चिमेकडील जामा मशीद व उत्तर-पश्‍चिमकडील मोमीनपुरा चौक हे मार्ग बंद. 

सतरंजीपुरा : प्रभाग 21 मधील उत्तर-पूर्वेस शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, दक्षिण-पूर्वेस रचना कॉम्प्लेक्‍स, दक्षिण-पश्‍चिमेस जुना मोटार स्टॅंड चौक, उत्तर-पश्‍चिमेस मारवाडी चौक टी-पॉईंट हे मार्ग बंद.
 
बैरागीपुरा : प्रभाग क्रमांक 21 व 22 च्या उत्तर-पूर्वेस ए.एम.ए. कंपनी मालधक्का रोड, दक्षिण-पूर्वेस उमिया शंकर शाळा, दक्षिण-पश्‍चिमेस मासुरकर चौक, उत्तर-पश्‍चिमेस होटल मदिना, पूर्वेस बोधीसत्व बौद्ध विहार हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. 

हंसापुरी : उत्तर-पश्‍चिम भागातील मोतीबाग रेल्वे ब्रिज, उत्तर-पूर्व भागातील पाचपावली रेल्वे ब्रिज, दक्षिण पूर्व भागात अग्रसेन चौक, दक्षिण-पश्‍चिम भागातील पोद्दारेश्‍वर राम मंदिर परिसरातून हंसापुरीत शिरण्याचे सर्व मार्ग बंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जास्तीत जास्त झाडे वाचवून नवीन लागवडीवर भर देणार"

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

SCROLL FOR NEXT