file photo 
नागपूर

पदाधिकारी, सदस्यांनी फिरवली बैठकीकडे पाठ, हे आहे कारण...

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेच अध्यक्षा रश्‍मी बर्वे यांचे पती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या धास्तीने पदाधिकारी, सदस्यांनी विषय समित्यांच्या बैठकींकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गुरुवारी महिला व बाल कल्याण समितीची बैठकी स्थगित करण्यात आली असून, शुक्रवारी होणारी शिक्षण समितीची बैठकी रद्द करण्यात आली आहे. 


जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एक कर्मचारी पॉझिटिव्हा आला होता. यामुळे संपूर्ण विभागील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सर्वांना अहवाल निगेटिव्ह आला. बुधावारी अध्यक्षा रश्‍मी बर्वे यांचे पती पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली.

त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ही माहिती कळताच पदाधिकाऱ्यांनी घर गाठले. गुरुवारी अनेकांनी जिल्हा परिषदेत पायच ठेवला नाही. महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीला दोन सदस्य उपस्थित होते. अपुऱ्या सदस्य संख्येमुळे सभा स्थगित करण्यात आली. शुक्रवारची शिक्षण समितीची बैठकही रद्द करण्यात आली आहे. 


25 जण निगेटिव्ह 


अध्यक्ष यांचे पती पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा परिषदेत 29 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यातील 25 जणांचे नमुने निगेटिव्ह आले.4 जणांच्या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असल्याचे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

SCROLL FOR NEXT