Coronas new strain in Nagpur corona update news 
नागपूर

चिंताजनक! नागपुरात कोरोनाचा नवीन स्ट्रेन? दिल्लीत पाठवलेल्या नमुन्यात म्युटेशन झाल्याने संसर्ग वाढला

केवल जीवनतारे

नागपूर : नागपुरातील मेयो आणि मेडिकलमधून सुमारे शंभरावर नवीन स्ट्रेनचे नमुने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत तपासणीसाठी दिल्ली तसेच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. २४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे नवे दोन स्ट्रेन आढळून आल्याचे जाहीर केले, मात्र शहराची नावे गुपित ठेवण्यात आली होती. मेयो रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. नवीन स्ट्रेन असल्यानेच कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढला असून नवीन स्ट्रेनने आता चिंता वाढवली आहे.

नागपुरातील मेयो रुग्णालयातून दिल्ली येथे पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. मागील दोन महिने नवीन स्ट्रेन आढळून आलेल्या शहरांची नावे गुपित ठेवण्यात आली होती. यामुळे यातील गूढ वाढले होते. राज्यभरातून सुमारे १५ ते २० टक्के नमुन्यांमध्ये हे नवीन म्युटेशन आढळून येत असल्याचे उघड झाल्यानंतर मात्र संशयाची सुई नागपूरच्या दिशेनेच होती. नागपुरातील मेयो रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये हे स्ट्रेन आढळून आले आहेत.

प्रचंड वेगाने वाढणारा कोविडचा उद्रेक लक्षात घेता कोरोनाचे स्वरूप बदलल्याचे बोलल्या जात आहे. नुकतेच महापौरांनी समाज माध्यमावर व्हिडिओ बनवून हे स्पष्ट केले आहे की, हे कोरोनाचे नवे स्वरूप आहे.

आम्हाला अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मेडिकल, मेयोतील वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधला असता, या विषाणूचे ‘म्यूटेशन’ (स्वरूप बदल) होत आहे. यामुळे याचा पॉझिटिव्हीटी दर अधिक आहे. काही नमुन्यांच्या तपासणीतून हे स्पष्ट झाले असून, नागपुरात म्यूटंट व्हायरस आहे.

  • राज्यात आढळलेल्या कोरोना स्ट्रेन E484Q आणि L448Q 
  • कोविडवर निरंतर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी नाव न सांगण्याच्या अटीवर कोरोनाचे म्युटेशन झाल्याचे मान्य केले आहे 
  • नवीन स्ट्रेन विषाणू इतर विषाणूंसारखा आहे 
  • प्रत्येक विषाणूत कालांतराने ‘म्युटेशन’ होते 
  • इन्फ्लूएन्झामध्येही तो आढळून आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT