नागपूर

नागपूर जिल्ह्यात डेंगीच्या ६ मृत्यूंवर शिक्कामोर्तब

नीलेश डाखोरे

नागपूर : कोरोना विषाणूच्या संकटामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने डेंगीने दगावलेल्या मृत्यूचे विश्लेषण (ऑडिट) समितीची वेळेअभावी बैठकच घेतली नव्हती. ही बाब दै. सकाळने प्रकाशित केली. यानंतर विभागीय स्तरावरील डेथ ऑडिट कमिटीची आरोग्य उपसंचालकांनी बैठक घेतली. बैठकीनंतर महापालिका हद्दीत डेंगीच्या तीन तर नागपूरच्या ग्रामीण भागात तीन अशा नागपूर जिल्ह्यात ६ मृत्यूची नोंद केली. तर नागपूर विभागात डेंगीच्या ९ मृत्यूवर विश्लेषण समितीने शिक्कामोर्तब केले आहे. (Coronavirus-Dengue-Six-death-in-Nagpur-District-Death-Audit-Committee-Meeting-nad86)

कोरोनापाठोपाठ डेंगीचा कहर सुरू असतानादेखील आरोग्य यंत्रणेकडून डेंगीच्या मृत्यूकडेही दुर्लक्ष करण्यात आले. सारे लक्ष कोरोनाकडे लागले होते. हे वृत्त सकाळने पुढे आणल्यानंतर समितीने अवघ्या काही दिवसांतच बैठक घेतली. मृताच्या रक्त चाचणीतील अहवाल आणि केसपेपरमधील उपचारासह इतर निरीक्षणानंतर साथरोग मृत्यू विश्लेषण समितीने नागपूर शहरात ३, नागपूरच्या ग्रामीण भागातील ३ अशा ६ डेंगीच्या मृत्यूची नोंद केली आहे. तसेच वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १ जण डेंगीने दगावल्याची समितीने नोंद केली.

नागपूर जिल्ह्यात ३७० डेंगीग्रस्तांची नोंद झाली आहे. यात नागपूर ग्रामीण भागातील १३७ तर २३३ जण नागपूर शहरातील आहेत. विशेष असे की, नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांमध्ये लहान मुले उपचारासाठी दाखल आहेत.

धूरफवारणीपासून महापालिका दूर

दोन महिन्यांपासून शहरात डेंगीचा उद्रेक सुरू झाला. कोरोनाच्या संकटानंतर डेंगी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याऐवजी महापालिकेचा आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत गेला. शहरातील वस्त्यांमध्ये धूरफवारणी करण्याची गरज होती. मात्र, अद्यापही फवारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. साथरोगांवर आळा घालण्यासाठी उपायायोजना केल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, फवारणीसाठी हातपंप, फॉ‌गिंग मशीन शहरातील वस्त्यांमध्ये अद्याप पोहोचले नसल्याचे नागरिक सांगतात. साथरोगावरील नियंत्रणाच्या नियोजनाचा अभाव महापालिकेच्या आरोग्य विभागात आहे.

जिल्हा डेंगीचे रुग्ण डेंगीचे मृत्यू

  • नागपूर शहर २३३ डेंगीग्रस्त ३ मृत्यू

  • नागपूर ग्रामीण १३७ डेंगीग्रस्त ३ मृत्यू

  • भंडारा ०७ डेंगीग्रस्त १ मृत्यू

  • चंद्रपूर डेंगीग्रस्त १ मृत्यू

  • वर्धा ८ डेंगीग्रस्त १ मृत्यू

(Coronavirus-Dengue-Six-death-in-Nagpur-District-Death-Audit-Committee-Meeting-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT