Coronavirus Update esakal
नागपूर

Coronavirus update : एकाच दिवशी २३० बाधित, एकाचा मृत्यू

जिल्ह्यात बाधितांचा वाढता आलेख शहरवासीयांच्या चिंतेत भर घालणारा आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी जिल्ह्यात २३० बाधितांची नोंद झाली तर एकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही कोरोनाने डोकेवर काढले असून दीडशेवर नागरिक बाधित निघाले. शहरात ७३ बाधितांची नोंद झाली. दरम्यान, ८४ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात बाधितांचा वाढता आलेख शहरवासीयांच्या चिंतेत भर घालणारा आहे. बाधितांच्या दोन अंकी आकड्यानंतर प्रथमच बाधितांची संख्या २३० पर्यंत पोहोचली. त्यामुळे नागरिकांनी आता सावध होण्याची गरज व्यक्त होत आहे.

गर्दी टाळण्याचे आवाहन

जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने नागरिकांना मास्कचा वापर,

एकाच दिवशी २३० बाधित, एकाचा मृत्यू

गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र असून नव्या बाधितांची संख्या धडकी भरविणारी आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत शहरापेक्षा बाधितांची संख्या कमी असलेल्या ग्रामीण भागात आज १५२ बाधित आढळले. शहरातील ७३ नवे बाधित असून एकाच्या मृत्यूचीही नोंद झाली.

सक्रीय रुग्णांची संख्याही ७७७

वाढत्या बाधितांमुळे सक्रीय रुग्णसंख्याही ७७७ पर्यंत पोहोचली. यात ग्रामीण भागातील ३६४ तर शहरातील ३९० जणांचा समावेश आहे. २३ जण जिल्ह्याबाहेरील आहेत. दरम्यान, आज ८४ जणांनी कोरोनावर मात केली असून यात शहरातील ५६ तर ग्रामीण भागातील २८ जणांचा समावेश आहे. २ हजार १३४ जणांच्या चाचणीतून २३० बाधित आढळले. ही टक्केवारी दहापेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT