suicide 
नागपूर

नागपूर हादरले! उच्चशिक्षित दाम्पत्याची दोन मुलांसह आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर : उच्चशिक्षित दाम्पत्याने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. अंगावर शहारा आणणारी ही घटना आज मंगळवारी कोराडीतील ओमनगरात घडली. प्रा. धीरज राणे (४२), डॉ. सुषमा धीरज राणे (३८), धृव (११) आणि लावण्या (६) अशी मृतांची नावे आहेत.

धंतोली येथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर सुषमा आणि रायसोनी कॉलेज आॅफ इंजीनियरिंग येथे प्रोफेसर असलेले त्यांचे पती धीरज राणे यांनी मुलगा धृव वय ११ वर्ष आणि मुलगी लावण्या वय वर्षे ६, या दोन चिमुकल्यांसकट आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सविस्तर वाचा - ते दुचाकीने दोन मुलींसह सासुरवाडीला आले अन् भेट ठरली अखेरची, वाचा... कंटेनरच्या धडकेत पित्याचा मृत्यू

त्यांच्यासोबत डॉक्टरची वयोवृद्ध आई राहात होती. मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास दाम्पत्यांशी वयोवृद्ध आईचे बोलणे झाले होते, असे निकटवर्तीयांनी सांगितले.सकाळी त्यांच्या खोलीचे दार ठोठावून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आरडाओरड केल्यानंतर घटना लक्षात आली. कोराडी पोलिसांनी घराचा ताबा घेतला असून, पोलिस निरीक्षक वझिर शेख यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू, १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नेमके काय केले बदल?

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवर मामेभावाकडून अत्याचार

India Exports: भारताच्या निर्यातीत ऐतिहासिक उच्चांक! ८६३ अब्ज डॉलरचे उत्पन्न, सेवा क्षेत्राचे मोठे योगदान, ‘सेवा निर्यात महासत्ता’ सिद्ध

विजय सरकार स्थापन करणार की राष्ट्रपती राजवट? राज्यपालांच्या एका निर्णयाकडे देशाचं लक्ष, आतापर्यंत अशा परिस्थितीत काय घडलं?

Thalapathy Vijay Opposition Leader Tamil Nadu : विजय थलपती मुख्यमंत्री नाही तर विरोधी पक्षनेता होणार?, भाजपकडून करेक्ट कार्यक्रम; तमिळनाडूचा रिमोट कंट्रोल मोदींच्या हाती

SCROLL FOR NEXT