Coronavirus esakal
नागपूर

Covid in Nagpur: नववर्षाच्या स्वागतावर संसर्गचिंतेचे सावट! जिल्ह्यात १२ नवे कोरोना बाधित, उपराजधानीत ११ नवीन रुग्ण

जुन्या वर्षाला समारोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारीला वेग आला असताना जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२ कोरोना बाधित आढळले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Corona Cases: जुन्या वर्षाला समारोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारीला वेग आला असताना जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२ कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २४ वर गेला आहे. आरोग्यविभागांसह इतरांच्याही चिंतेत भर पडली आहे.

विशेष म्हणजे मोठ्यांसोबतच अल्पवयीन मुलांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे शहरात ११ तर ग्रामीणमधून १ पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ५ रुग्ण अल्पवयीन आहेत. या सर्वच रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या अल्पवयीन रुग्णांमध्ये १२ ते १७ वयोगटातील मुले आहेत. यामुळे मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नव्या बाधितांमध्ये पाच महिला व सहा पुरुष आहेत. २२ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ४ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तर ज्येष्ठ रुग्णांमध्ये ७० वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष, ७१ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिलेला कोरोनाचे निदान झाले. नवीन रुग्णांमुळे शहरातील सक्रिय बाधितांची संख्या आता २२ वर पोहचली आहे. तर ग्रामीणलाही २ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी चार रुग्ण शहरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. परंतु त्यांची प्रकृती स्थिर असून कुणालाही प्राणवायूची गरजही पडली नाही असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT