Covid Center set up by Commissioner Mundhe, will not turn into covid hospital 
नागपूर

आयुक्त मुंढेंनी तयार केलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये नव्हे तर येथे तयार होणार कोव्हीड रुग्णालय, सविस्तर वाचा

राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनाग्रस्तांना तातडीने बेड उपलब्ध होऊन वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मानकापूर येथील स्पोर्ट्‍स कॉम्प्लेक्सची कोव्हीड जम्बो रुग्णालयासाठी निवड केली. ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियमवर व आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यासमधील कोव्हीड सेंटरबाबत विचार करण्यात आला. परंतु डॉ. राऊत यांनी मानकापूर स्टेडियम सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे सांगितले.

कोरोनाग्रस्तांसाठी मुंबई तसेच पुणे येथे तयार करण्यात आलेल्या ‘जम्बो हॉस्पिटल’च्या धर्तीवर शहरात एक हजार रुग्णांसाठी हॉस्पिटलची स्थापना करण्यासंदर्भात पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. वाढत्या कोरोनाग्रस्तांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करून शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची निर्मिती करण्यात येत आहे.’

जम्बो हॉस्पिटल’च्या निर्मितीमुळे कोरोनाग्रस्तांशिवाय इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची डॉ. राऊत यांनी माहिती घेतली.

याशिवाय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास येथे तयार केलेल्या कोव्हीड केअर सेंटरबाबतही विचारणा केली. परंतु आयुक्तांच्या संकल्पनेला मागे टाकत पालकमंत्री डॉ. राऊत यांनी मानकापुरातील स्पोर्टस कॉम्प्लेक्सला प्राधान्य दिले. आयुक्तांनी तयार केलेल्या कळमेश्वर मार्गावरील कोव्हीड केअर सेंटरचा तूर्तास पावसामुळे बोजवारा उडाला आहे.

या कोव्हीड सेंटरचे रुपांतर रुग्णालयात करण्यात येणार होते. बैठकीत एएए हेल्थ कन्संटन्सी सर्विसेसचे डॉ. अहमद मेकलाई, डॉ. अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर, माजी आमदारांविरोधात भाजप आक्रमक; चौकशीची मागणी

Cervical Cancer Early Detection: महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार; कामा रुग्णालयातील तज्ज्ञांच्या अभ्यासातून उघड

IPL 2026 Updates: हार्दिकनंतर Mumbai Indians एका जुन्या सहकाऱ्याला परत आणणार; रोहितच्या जागेसाठी सुरू झालाय बॅक अप प्लान

Google Gemini Bhaubeej image Prompt: गुगल जेमिनी प्रॉम्प्ट्सने बनवा भावा-बहिणीचे खास AI फोटो

Latest Marathi News Live Update : अक्सा समुद्रात बुडाल्याने एक युवक बेपत्ता

SCROLL FOR NEXT