नागपूर

Covid Update: नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; मात्र, JN1 व्हेरियंटबाबत घोळ कायम

महानगरपालिकेच्या सर्वच झोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी (ता.१) ५ नवीन बाधितांची भर पडली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Covid Patients: महानगरपालिकेच्या सर्वच झोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी (ता.१) ५ नवीन बाधितांची भर पडली. यामुळे नागपुरात आठवडाभरात एकूण सक्रिय बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. विशेष असे की, बाधितांचा आकडा अर्धशतकापलिकडे पोहोचला आहे. मात्र जिनोम सिक्वेंसिगसाठी पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबित असल्यामुळे जेएन.१ या व्हेंरियंटबाबत घोळ कायम आहे.

सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या एकही रुग्ण नाही. परंतु यापूर्वी पाच रुग्ण होते. चार रुग्ण बरे झालेत. आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.महापालिकेकडून नवीन जेएन.१ व्हेरियंटच्या तपासणीसाठी सर्व बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेंसिगंसाठी निरी वा इतर जनुकीय चाचणी प्रयोगशाळेत पाठवले गेले आहेत.

काही अहवाल गेले दिल्लीत
उपराजधीनीतून जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवलेल्या पहिल्या सात ते आठ चाचण्यांचे अहवाल निरीच्या प्रयोगशाळेने केंद्रीय संस्थेला पाठवले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु, निरीकडून नागपुरातील आरोग्य खात्याला थेट अहवाल मिळाला नाही.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता स्थानिक आरोग्य विभागाला अहवाल न देता थेट केंद्राला अहवाल पाठविण्याच्या नियमांवर बोट ठेवण्यात येत असल्याचा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा आरोग्य विभागात आहे. स्थानिकांना तातडीने हे अहवाल मिळत नसल्यास येथे ‘जेएन’ १ चे वेगाने होणारे संक्रमण थांबणार कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT