covid 
नागपूर

नागपूरात सुरू आहे कोव्हॅक्‍सिन लसीचा प्रयोग!

केवल जीवनतारे

नागपूर : भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्‍सिन लसीची क्‍लिनिकल ट्रायल नागपूरच्या गिल्लूरकर मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये २७ जुलै रोजी सुरू झाली. जुलै ऑगस्टमध्ये ५० स्वयंसेवकांना पहिल्या टप्प्यात दोन वेळा लस टोचण्यात आली आहे. यानंतर दहा सप्टेंबरला याच लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रयोगाला सुरूवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ५० जणांना पहिला डोस दिला. येत्या ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान दुसऱ्या टप्प्यातील दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे कळते.

नागपुरात कोव्हॅक्‍सिन लसीवर क्‍लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांपर्यंत होणाऱ्या रिॲक्‍शनवर नजर ठेवण्यात येत आहे. दर दिवसाला प्रत्येकाची चाचणी करण्यात येत आहे. २० दिवस लोटून गेले आहेत. आतापर्यंत कोणालाही रिॲक्शन झाली नाही. दुसऱ्या डोसमधील स्वंयसेवकांच्या रक्ताचा अहवाल दिल्ली येथे सेंट्रल लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

नागपुरातील गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दीडशेवर व्यक्तींवर लसीची क्‍लिनिकल ट्रायल करण्यात आली आहे. यात कोणाला कोणताही त्रास जाणवला नाही. या लसीचे पहिल्या टप्प्यातील ५५ व्यक्तींवरील निरीक्षणही सकारात्मक दिसून आले होते, असे गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील सकारात्मक परिणामामुळे दुसऱ्या टप्प्यातील परिणामाकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. देशातील एकूण १२ केंद्रांवर या चाचण्या होत आहेत.

सविस्तर वाचा - दिल धडक धडक के कहे रहा है! असे ठेवा हृदय सशक्त!

नागपुरात सुमारे ३८० व्यक्तींवर प्रयोग करण्यात येणार आहेत. पुढे ४२, १०४ आणि १९४ व्या दिवशी लस टोचण्यात येईल. प्रत्येकाच्या रक्ताची चाचणी करून ऍन्टिबॉडीची तपासणी होत आहे, अशी माहिती डॉ. गिल्लूरकर यांनी दिली.

लसीचा दुष्परिणाम नाही
कोव्हॅक्‍सिन लसीच्या प्री-क्‍लिनिकल ट्रायलला दोन महिने होत आहेत. पहिल्या तरुणाला २७ जुलै रोजी लस टोचली होती. पहिला टप्पा पुर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यातील पहिला डोस २८ दिवसांपुर्वी दिला. येत्या ७, ८ आणि ९ ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यातील दुसरा डोस देण्यात येणार आहे. दरवेळी स्वंयसेवकांच्या कोरोना चाचणीसह संबंधित इतर चाचण्या करण्यात येतात. कोणावरही लसीचा दुष्परिणाम अद्याप दिसला नाही.
डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Mumbai Local Megablock: महिन्याच्या पहिल्याच रविवारी खोळंबा, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकलवर परिणाम

Asian Youth Games 2025: चाळीतून उंच भरारी! पुण्याच्या चंद्रिकाने बहरीनमध्ये मुष्टियुद्धात सुवर्णपदकावर कोरले नाव

Purandar Airport : भूसंपादनासाठी हवे पाच हजार कोटी, प्रस्तावित पुरंदर विमानतळ; जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या प्रसिद्ध कलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांच्या कुटुंबाशी संवाद साधला

SCROLL FOR NEXT