JN.1 Covid esakal
नागपूर

Nagpur Corona Update : नागपुरात जेएन १ व्हेरियंटचे २० रुग्ण

व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत असतानाही प्रशासनाकडून कुठल्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Corona Update : कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘जेएन १’ ने शहरासह जिल्ह्यात शिरकाव केला आहे. शुक्रवारी (ता.५) शहरात याचे १८ तर ग्रामीण भागात दोन असे २० बाधित आढळले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत असतानाही प्रशासनाकडून कुठल्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

संशयितांचे निरीच्या प्रयोगशाळेकडे ३८ नमुने जिनोम फ्रिक्वेंसिंगसाठी पाठविले होते. त्यापैकी शहरातील १८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. ते मनपाच्या धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर झोनमधील आहेत.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ५२ सक्रिय बाधित होते. त्यातील ४२ मनपाच्या हद्दीतील तर उर्वरित ११ बाधित ग्रामीण भागातील आहेत. त्यापैकी २० जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाली होती. त्यातील फक्त ८ सक्रिय बाधित गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

दोन दिवसात ५२ रुग्ण

कोरानाच्या नव्या व्हेरियंटच्या बाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत असून दोन दिवसात रुग्णांची संख्या ४० च्यावर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे.

१० जणांना सौम्य लक्षणे

जिल्हा आरोग्य यंत्रणेने जेएन१ च्या शिरकावाला दुजोरा दिला असून निरीच्या प्रयोगशाळेने जिनोम फ्रिक्वेंसिंगमध्ये या २० जण सकारात्मक असल्याची माहिती दिली. समाधानाची बाब म्हणजे यापैकी १० जणांना सौम्य लक्षणे होती.

ते सुद्धा आता उपचाराने बरे होऊन विलगीकरणातून बाहेर पडले आहेत. सध्याच्या स्थितीत नव्या व्हेरियंटचे ८ सक्रिय रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यांनाही सौम्य लक्षणे असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

SCROLL FOR NEXT