नागपूर

मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या डबल डेकर पुलाला तडे; अवघ्या ८ महिन्यात दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील नोव्हेंबरमध्ये वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या वर्धा मार्गावरील डबल डेकर पुलाला (Double decker flyover Nagpur) मनीषनगर वळणावर तडे गेले. वाहनांची वर्दळ असलेल्या अत्याधुनिक पुलाला आठ महिन्यांमध्येच तडे गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महामेट्रोने (Maharashtra Metro) याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कंत्राटदार कंपनी एनसीसीवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. (cracks on double decker flyover in Manish nagar Nagpur)

मनीषनगर, बेसा, बेलतरोडीकडून वर्धा मार्गावर येताना मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग दिवसातून १३५ वेळा बंद होत असल्याने वर्धा मार्गावर तयार होत असलेल्या डबल डेकर पुलाला जोड देत उड्डाणपूल बांधण्यात आला. आठ महिन्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.

देशातील स्थापत्य अभियांत्रिकीचा नमुना असलेल्या या पुलाला मनीषनगर वळणावर दोन दिवसापूर्वीच तडे गेले. विशेष म्हणजे सिमेंटचा एक दहा ते बारा किलोचा तुकडा खाली पडला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. डबल डेकर पुलापासून मनीषनगर उड्डाणपूल ८८५ मीटरचा आहे.

या पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. या बांधकामाची देशभरात स्तुती झाली. परंतु गेल्या आठ महिन्यांत पुलाला तडे गेल्याने मेट्रोच्या प्रतिष्ठेलाही धक्का लागला. याप्रकरणी मेट्रोने कंत्राटदार कंपनीवर कारवाईचे संकेत दिले आहे.

रात्री कोसळला पुलाचा भाग

पुलाला तडे गेल्याचं समजताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र रविवारी रात्री या पुलाचा एक तडा गेलेला स्लॅबचा तुकडा खाली कोसळला. सुदैवानं रात्रीची वेळ असल्यानं वाहतूक नव्हती.

या घटनेचे महामेट्रोने दखल घेतली. या प्रकरणी पूर्ण चौकशी करण्यात येत असून कंत्राटदार एनसीसी कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे.
- अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक, कार्पोरेट व कम्युनिकेशन.

(cracks on double decker flyover in Manish nagar Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT