Cricket sakal
नागपूर

Time Out Wicket: आंबेडकर मैदानावर घडला अनोखा इतिहास! क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजाला देण्यात आलं ‘टाइम आऊट’ बाद

आयसीसी विश्वकरंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज एंजेलो मॅथ्यूज क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच ‘टाइम आऊट’ झाल्यानंतर नागपुरातही या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Cricket Timeout Wicket: आयसीसी विश्वकरंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज एंजेलो मॅथ्यूज क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच ‘टाइम आऊट’ झाल्यानंतर नागपुरातही या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेदरम्यान एका फलंदाजाला पंचांनी चक्क ‘टाइम आऊट’ पद्धतीने बाद दिले. दुर्दैवीरित्या बाद होणारा हा फलंदाज आकाश कुमार होता. या नाट्यमय घटनेची क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

ही ऐतिहासिक घटना विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित गजदर क्रिकेट ‘अ’ डिव्हिजन स्पर्धेदरम्यान गुरुवारी घडली. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर मैदानावर गुरुवारपासून रेशीमबाग जिमखाना आणि इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब यांच्यात दोनदिवसीय सामना आरंभ झाला.

संदेश द्रुगवारच्या (१९६ चेंडूंत १२३ धावा) शतकाच्या जोरावर रेशीमबाग जिमखाना संघाने पहिल्या डावात २७९ धावा केल्यानंतर फलंदाजीसाठी इलेव्हन स्टारचे फलंदाज मैदानात उतरले. इलेव्हन स्टारचा सलामीवीर गौतम वैद्य शून्यावर बाद झाल्यानंतर आयसीसीच्या नियमानुसार नवीन फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत क्रीजवर पोहोचून गोलंदाजाचा चेंडू खेळणे आवश्यक असते.(Latest Marathi News)

मात्र आकाश कुमारने ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण केली नाही. दोन मिनिटे होऊनही फलंदाजीसाठी तयार न झाल्याने मैदानावर पंचांनी त्याला ‘टाइम आऊट’ बाद दिले. पंचांनी बाद ठरविल्यामुळे साहजिकच आकाश कुमारलाही निराश होऊन मैदान सोडावे लागले.

दोन महिन्यांमध्ये भारतात घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज एंजेलो मॅथ्यूज ‘टाइम आऊट’ पद्धतीनेच बाद झाला होता. (Latest Marathi News)

आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील ती पहिली घटना ठरली होती. मैदानावर खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन न केल्याबद्दल बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनवर त्यावेळी टीकासुद्धा झाली होती. या यादीत आता वैदर्भी फलंदाज आकाश कुमारचाही समावेश झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT