नागपूर

क्रिकेटपटू ऋतुजाची उत्तुंग भरारी; स्वप्नभंग होण्याची शक्यता

परिस्थिती बिकट असताना यश मिळवलेली उदाहरणे तशी अपवादानेच पाहायला मिळतात.

राम वाडीभष्मे

धानला (जि. नागपूर) : माणसातील कलागुण कुणा एकाची मक्तेदारी नसते, असं म्हणतात. याला दुजोरा देणारी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असताना यश मिळवलेली उदाहरणे तशी अपवादानेच पाहायला मिळतात. यातील बहुसंख्य तरुण तर परिस्थितीच्या रेट्यामुळे कलागुण असूनही मागे पडतात. अशीच परिस्थिती आहे मौदा तालुक्यातील खात येथील ऋतुजा अशोक वैद्य या युवा महिला क्रिकेटपटूची.

अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या टेनिसबॉल क्रिकेटपटू ऋतुजाचे वडील शेतकरी आहेत. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना ती कठोर परिश्रम करून राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. नुकत्याच गोवा येथे आयोजित १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिने द्वितीय स्थान पटकावले. तिची ही कामगिरी तालुक्यासाठी कौतुकाची बाब आहे. ऋतुजाला भविष्यात मोठी झेप घ्यायची इच्छा आहे. परंतु आर्थिक परिस्थिती तिच्या उज्वल भविष्यात अडथळे ठरू पाहात आहेत.

बीएससी (मायक्रो बायोलॉजी) तृतीय वर्षात शिकत असलेली ऋतुजा राष्ट्रीय स्तरावरील उत्तम क्रिकेटपटू आहे. तिने आठव्या वर्गापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. घरची परिस्थिती लक्षात घेऊन मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अल्पावधीतच ती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. ऋतुजाने गोरखपूर येथील स्पर्धेत द्वितीय स्थान, हरिद्वार येथे तिसरे आणि कन्याकुमारी येथील सिनिअर नॅशनल आणि नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले आहे.

याशिवाय स्कुलगेम अंतर्गत तेलंगण येथे झालेल्या लेदरबॉल राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतही द्वितीय स्थान मिळविले. राज्य पातळीवर तलवारबाजी स्पर्धेतसुद्धा शानदार प्रदर्शन केले आहे. गुणवत्ता असूनही ऋतुजाला भविष्य अंधकारमय वाटू लागले आहे. गरिबीमुळे पुढील सराव व प्रशिक्षणाची तिला चिंता वाटत आहे. आर्थिक मदत मिळावी किंवा एखाद्या अकादमीत दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, यासाठी तिचे वडील राजकीय नेत्यांना भेटले. मात्र कुणाकडूनही त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने संपूर्ण कुटुंब दुःखी व निराश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT