5 lakh snatched from elderly couple sakal
नागपूर

वृद्ध दाम्पत्याकडून हिसकावले ५ लाख

`एमआयडीसी’तील ‘एसबीआय’ शाखेसमोरील घटना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेसमोरून वृद्ध दाम्पत्याच्या हातातून ५ लाख रुपये असलेली बॅग दुचाकीवरुन येणाऱ्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (ता.३) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास घडली. एका क्षणात वृद्ध दाम्पत्याची आयुष्याची कमाई गेल्याने ते चांगलेच हतबल झाले आहेत.शिवकुमार विश्‍वकर्मा (वय ६३) हे पोलिस विभागातील राज्य राखीव पोलिस दलातून सहाय्यक पोलिस निरीक्षक पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते.

त्यामुळे सेवानिवृत्तीचे पैसे बॅंकेत जमा होते. आज दुपारी अडीच वाजता ते पैसे काढण्याकरिता पत्नी मीना प्रजापती हिच्यासोबत ‘एमआयडीसी’ परिसरातील ‘एसबीआय’ बँकेत आले. त्यांनी बॅंकेतून ५ लाख रुपयांची रोकड काढून पिशवीत भरली आणि ती पत्नीच्या हातात दिली. शिवप्रसाद त्यांच्या मोपेडला सुरू करण्यासाठी किक मारत असताना मागून दोन युवक बाईकवर आले. त्यांनी मीना यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. शिवप्रसादने आरडाओरडा केला. मात्र, मदतीला कोणीच नसल्याने आरोपी पळून गेले. दरम्यान याबाबत त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ‘एमआयडीसी’चे पोलिस निरीक्षक उमेश बेसकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला. यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस हिंगणा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींचा शोध घेत आहे. आरोपी हे बँकेमधूनच वृद्ध दाम्पत्याच्या मागावर असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे बँकेतील सीसीटिव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT