नागपूर

Crime: हिंगणघाट येथे कृषी केंद्रात धाडसी चोरी; एक लाख तीन हजार रुपये लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

सकाळ डिजिटल टीम

हिंगणघाट: शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या कोचर बियाणे या कृषी केंद्रात मंगळवारी (ता.२७) पहाटेच्या सुमारास तीन चोरट्यांनी धाडसी चोरी करून एक लाख तीन हजार रुपयाची रोख रक्कम लंपास केली.

अवघ्या दोन मिनिटात दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी हा डल्ला मारला. या परिसरात चोरी होण्याची ही लागोपाठ दुसरी घटना आहे.

सविस्तर वृत्त असे की, मोहता चौकातील कोचर बियाणे या कृषी केंद्राजवळ चोरटे साडेचार वाजताच्या सुमारास आले. यापैकी दोघांच्या हातात कापडी थैल्या होत्या. यातील दोन चोरटे या कृषी केंद्रा समोरील ओट्यावर काही वेळ बसले आणि एक चोरटा या रस्त्याने येणारा जाणाऱ्यांकडे पाळत ठेवत होता.

रस्ता निर्मनुष्य असल्याची खात्री झाल्याने हे तिन्ही चोरटे कोचर बियाण्याच्या दुकानाच्या शटर जवळ गेले. त्यांनी अवजाराच्या साह्याने शटर काही प्रमाणात वर करून दोन चोरट्यांनी दुकानाच्या आत प्रवेश केला.

यातील एक चोरटा बाहेर पाळत ठेवत होता. दुकानाच्या आत प्रवेश करताच चोरट्यांनी दुकानाच्या काउंटर जवळ जात ड्रावर तोडून त्यातील एक लाख तीन हजार रुपये रोख रक्कम लंपास करित तेथून पळ काढला.

यातील दोन चोरट्यांनी एका दिशेने तर तिसऱ्याने विरुध्द दिशेने पळ काढला. पहाटे ४.३० वाजता कृषी केंद्राजवळ चोरी करण्याकरिता आलेले हे चोरटे दोनच मिनिटात ४.३२ वाजता दुकानातील रक्कम घेवून पसार झाले.

हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. काही दिवसांपासून याच प्रकारे या परिसरातील इलेक्ट्रोनिक्स च्या दुकानात शटर तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. दुकानाच्या समोरच पंजाब बँक, वणा नागरिक सह.

बँक व विदर्भ अर्बन बँक आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या परिसरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने हे चोरटे सराईत चोरटे असल्याचे निदर्शनास येत आहे.

दरम्यान या चोरी प्रकरणात कोचर बियाणेचे संचालक पंकज श्रीचंद कोचर यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली असून पोलिसांनी वर्धा येथून श्वान पथक तसेच फिंगर प्रिंट द्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यार कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिस अधिक तपास करीत आहे.

परिसरात एकाच प्रकारे दुसऱ्यांदा चोरी

या परिसरातील चंद्रवदन बेलेकर यांच्या श्रीस्वामी समर्थ इलेक्ट्रोनिक्स या दुकानात २१ जूनला मध्यरात्री दुकानाचे शटर तोडुन काउंटरवरील सामानाची फेकाफेक करून ड्रावर मधील ३० रुपये लंपास केले होते.

या दुकानाचे सिसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचा शोध लागला नाही. आता आठवड्यात दुसऱ्यांदा चोरी झाल्याने परिसरातील व्यापारीपेठेत असुरक्षतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha polls: राज्यसभेत ‘क्रॉस वोटिंग’ची चर्चा; फक्त काही आमदार बदलू शकतात सगळं चित्र; कोणते आमदार बदलणार खेळ?

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

SCROLL FOR NEXT